पुणेकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी ‘या’ भागातील पाणीपुरवठा बंद राहणार

On: April 14, 2026 7:24 PM
Pune Water Cut
---Advertisement---

Pune Water Cut | पुणे (Pune) शहरातील नागरिकांसाठी पाणीपुरवठ्याबाबत महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. जलशुद्धीकरण केंद्रे आणि साठवणूक टाक्यांच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. प्रशासनाने नागरिकांना आधीच पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आणि जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.

देखभाल कामांमुळे पाणीपुरवठा बंद :

पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) अंतर्गत येणाऱ्या विविध जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर देखभाल आणि दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांमुळे बुधवारी मध्यरात्रीपासून गुरुवारी रात्रीपर्यंत पाणीपुरवठा पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. नवीन व जुने पर्वती केंद्र, राजीव गांधी पंपिंग स्टेशन तसेच लष्कर, वारजे, वडगाव या ठिकाणांवर कामे केली जाणार आहेत.

याशिवाय चांदणी चौक, गांधी भवन, पॅनकार्ड क्लब परिसर, शिवणे इंडस्ट्रीज, एसएनडीटी, चतु:श्रृंगी परिसर, होळकर जलकेंद्र, खडकवासला जॅकवेल आणि भामा-आसखेड प्रकल्प या ठिकाणीही कामे होणार असल्याने शहरभर पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे सर्व भागांतील नागरिकांना या बंदचा फटका बसणार आहे.

Pune Water Cut | शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा :

या दुरुस्तीमुळे सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, कात्रज, धनकवडी, आंबेगाव आणि कोंढवा या भागांत पूर्णपणे पाणीपुरवठा बंद राहील. तसेच हडपसर, मुंढवा, मांजरी, फुरसुंगी, खराडी, चंदननगर, विमाननगर, विश्रांतवाडी आणि लोहगाव या पूर्व भागांमध्येही पाण्याची टंचाई जाणवेल. पश्चिमेकडील कोथरूड, बावधन, वारजे, बाणेर, बालेवाडी, औंध, पाषाण आणि सुस रोड परिसरातही पाणीपुरवठा खंडित राहणार आहे. (pmc water supply)

महापालिकेच्या माहितीनुसार, गुरुवारी रात्रीपर्यंत पुरवठा बंद राहील आणि शुक्रवारी (17 एप्रिल) सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नियमित पुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखी वेळ लागू शकतो. प्रशासनाने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आणि अपव्यय टाळण्याचे आवाहन केले आहे. या कामांमुळे सध्या अडचण निर्माण होणार असली तरी भविष्यात पाणीपुरवठा अधिक कार्यक्षम करण्यासाठी ही पावले महत्त्वाची असल्याचे सांगण्यात आले आहे.

News title : Pune Water Supply Shutdown Alert

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now