पुणेकरांनो पाणी जपून वापरा! ‘या’ भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार

On: July 31, 2025 12:54 PM
Thane water cut
---Advertisement---

Pune Water Supply Cut | पुणेकरांना आज पाण्याच्या तुटवड्याचा सामना करावा लागणार आहे. वडगाव जलकेंद्रात महावितरण कंपनीकडून दुरुस्तीचे काम हाती घेतले असल्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. पुणे महानगरपालिकेने नागरिकांना पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आणि अपव्यय टाळण्याचे आवाहन केले आहे. (Pune Water Supply Cut)

दुपारी १२ ते २ दरम्यान बंद राहणार जलकेंद्र :

वडगाव जलकेंद्राच्या अखत्यारीतील खालील भागांमध्ये आज कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे:

हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द व बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर (भाग २), आंबेडकरनगर, टिळकनगर, दाते बस स्टॉप परिसर.

याशिवाय, सच्चाई माता टाकी, संतोष नगर, सुंदा माता नगर, वंडर सिटी, मोरेबाग, श्रीहरी टाकी, बालाजी नगर, पवार हॉस्पिटल परिसर, केदारेश्वर टाकी, सुखसागर नगर (भाग १ व २), राजेश, उत्कर्ष व सुंदरबन सोसायट्या, शेलार मळा, कात्रज गावठाण, भारत नगर, वरखडे नगर, जुना प्रभाग ३८ व ४१ आणि येवलेवाडी परिसर यांनाही याचा फटका बसणार आहे.

Pune Water Supply Cut | पाण्याचा साठा करून अपव्यय टाळा – महापालिकेचे आवाहन :

महावितरणकडून आज दुपारी १२ ते २ या वेळेत वडगाव जलकेंद्रातील वीजपुरवठा खंडित राहणार असून, या कालावधीत पाणीपुरवठा यंत्रणा पूर्णतः बंद राहणार आहे. त्यामुळे त्या परिसरात व त्याअंतर्गत येणाऱ्या इतर भागांतही पाणी कमी दाबाने येण्याची शक्यता आहे. (Pune Water Supply Cut)

पाणीपुरवठा विस्कळीत होणार असल्याने पुणे महानगरपालिकेने नागरिकांना विनंती केली आहे की, ते आवश्यकतेनुसार पाण्याचा साठा करून ठेवावा आणि गरजेपेक्षा अधिक पाण्याचा वापर टाळावा. पाण्याची कमतरता जाणवू नये यासाठी प्रत्येकाने पाण्याचा सुयोग्य वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

News Title : Pune Water Supply Alert: Low Pressure Supply in Several Areas Today Due to Maintenance at Vadgaon Water Centre

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now