पुणेकरांनो लक्ष द्या! कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे रस्ते ठप्प; ‘या’ मार्गांचा वापर करा

On: July 24, 2026 11:48 AM
Solapur Traffic Diversion
---Advertisement---

Pune Traffic Diversion | देशभरात आज कॉक्रोच जनता पार्टी (Cockroach Janata Party) यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विविध शहरांमध्ये मोर्चे आणि निदर्शने आयोजित करण्यात आली आहेत. त्याचा परिणाम पुणे (Pune) शहरातील वाहतुकीवरही होणार असून, काही प्रमुख रस्त्यांवर तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. नागरिकांनी प्रवासाचे नियोजन करताना पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीचे नवे नियोजन :

20 जुलै रोजी दिल्लीतील जंतरमंतर (Jantar Mantar) ते संसद परिसरापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चानंतर सीजेपीने 24 जुलै रोजी देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनात विद्यार्थी संघटना आणि विविध सामाजिक संघटनांनी शांततेच्या मार्गाने सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेकडून करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतुकीचे विशेष नियोजन करण्यात आले आहे.

पुणे शहर वाहतूक पोलीस (Pune City Traffic Police) यांनी अधिकृत ‘X’ खात्यावर यासंदर्भात सूचना प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये आजच्या मोर्चामुळे काही महत्त्वाच्या रस्त्यांवर तात्पुरते वाहतूक बदल लागू करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. नागरिकांनी प्रवासापूर्वी मार्गाची माहिती तपासून पर्यायी रस्त्यांचा वापर करावा तसेच वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Pune Traffic Diversion | ‘हे’ मार्ग टाळा, पर्यायी रस्त्यांचा वापर करा

आजचा मोर्चा लाल महाल (Lal Mahal) येथून सुरू होऊन फडके हौद, दारुवाला पूल, नरपतीगिरी चौक, बेलाई माता मंदिर चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय (Collector Office) येथे पोहोचणार आहे. या संपूर्ण मार्गावर काही काळ वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी आगाऊ नियोजन केले आहे.

वाहतूक विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार, गणेश रोडवरील वाहतूक लक्ष्मी रोडकडे वळविण्यात आली आहे. केळकर रोडवरून प्रवास करणाऱ्यांनी सूर्या हॉस्पिटल – 15 ऑगस्ट चौक मार्गाचा वापर करावा. शिवाजी रोडवरील वाहतूक एबीसी चौक – फुटका बुरुज मार्गे वळविण्यात आली आहे. तसेच नेहरू रोडवरील वाहनांसाठी जंगली महाराज रोड, नदीपात्र मार्ग किंवा टिळक रोड – बॅनर्जी चौक – नेहरू मेमोरियल मार्ग हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांनी प्रभावित रस्ते शक्यतो टाळावेत आणि पर्यायी मार्गांचा वापर करून प्रवास करावा, असे पुन्हा एकदा नागरिकांना आवाहन केले आहे.

News Title: Pune Traffic Diversions for CJP Protest

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now