पुणेकरांनो ‘हे’ दोन महत्वाचे पूल बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

On: June 2, 2026 1:44 PM
Solapur Traffic Diversion
---Advertisement---

Pune Traffic Diversion | पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हवेली (Haveli) आणि राजगड (Rajgad) तालुक्यातील दोन महत्त्वाचे पूल सुरक्षेच्या कारणास्तव वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. संबंधित पुलांची अवस्था अत्यंत जीर्ण झाल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला असून नागरिकांना आता पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे. या बदलाचा परिसरातील दैनंदिन वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रशासनाने दोन्ही पुलांची तांत्रिक तपासणी केल्यानंतर त्यांची संरचना कमकुवत झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने वाहतूक बंद करण्यात आली आहे. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. वाहनचालकांनी नवीन मार्गांची माहिती घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुठा नदीवरील पूल कायमस्वरूपी बंद :

हवेली तालुक्यातील कातवडी-कॉदूर-निळकंठेश्वर मार्गावरील मुठा नदी (Mutha River) वरील पूल अत्यंत धोकादायक अवस्थेत पोहोचला आहे. पुलाची स्थिती लक्षात घेता प्रशासनाने हा पूल कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या मार्गाचा वापर करणाऱ्या नागरिकांना आता पर्यायी रस्त्यांचा आधार घ्यावा लागणार आहे. (Pune Traffic Diversion)

पूल बंद झाल्यानंतर वाहतुकीचे नियोजन नव्याने करण्यात आले आहे. कातवडीकडून डावजे आणि कुरणच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना कातवडी-बहुली-कोंढूर-डावजे-जांभळी-कुरण या मार्गाने प्रवास करावा लागणार आहे. तर कुरण आणि डावजे परिसरातून कातवडीकडे येणाऱ्या वाहनांसाठी कुरण-जांभळी-डावजे-कोंढूर-बहुली-कातवडी हा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. प्रशासनाने वाहनचालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे आणि पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

Pune Traffic Diversion | पानशेतजवळील 68 वर्षे जुना पूलही वाहतुकीसाठी बंद :

राजगड तालुक्यातील खानापूर-पानशेत मार्गावरील पानशेत वसाहतीजवळील सुमारे 68 वर्षे जुना पूल देखील धोकादायक स्थितीत असल्याचे आढळून आले आहे. पुलाची संरचना कमकुवत झाल्यामुळे सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक तात्काळ बंद करण्यात आली आहे. त्यामुळे पानशेत, लवासा आणि वरसगाव परिसरातील प्रवाशांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागणार आहे.

या निर्णयानंतर लवासा (Lavasa) आणि वरसगाव (Varasgaon) परिसरातून पानशेतकडे जाणाऱ्या वाहनांसाठी निळकंठेश्वर-डावजे-कोंढूर-बहुली-कातवडी-मांडवी-कुडजे-खडकवासला धरणमार्ग-गोऱ्हे-खानापूर हा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. तसेच पानशेत आणि वरसगाव भागातून पुणे (Pune) शहराकडे येणाऱ्या वाहनांना कुरण खुर्द-राणवडी-सोनपूर-ओसाडे-खानापूर-गोऱ्हे-खडकवासला धरणमार्ग-कुडजे-मांडवी-कातवड-बहुली-कोंढूर-डावजे–निळकंठेश्वर या मार्गाने प्रवास करावा लागणार आहे. नागरिकांनी अनावश्यक गैरसोय टाळण्यासाठी प्रवासापूर्वी मार्गांची माहिती घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

News Title: Pune Traffic Diversion After Bridge Closure

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now