पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! शहराला मिळणार ४ वंदे भारत ट्रेन, ‘या’ मार्गांवर धावणार

On: July 17, 2025 9:42 AM
Pune News
---Advertisement---

Pune News | पुणेकरांसाठी रेल्वे मंत्रालयाकडून आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या वतीने पुणे शहरातून चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरु होणार असून, यामुळे पुण्याची हाय-स्पीड रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे. विशेष म्हणजे, या चारही ट्रेन वेगवेगळ्या दिशांना धावणार असून प्रवाशांचा प्रवास जलद, सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे.

या वंदे भारत ट्रेनमुळे शेगाव, वडोदरा, सिकंदराबाद आणि बेळगाव या चार महत्वाच्या ठिकाणांशी पुण्याची नवी नॉन-स्टॉप रेल्वे कनेक्टिव्हिटी तयार होणार आहे. यासोबतच पुणे-नागपूर स्लीपर वंदे भारत ट्रेनही सुरु होणार आहे, ज्याचा फायदा व्यावसायिक, विद्यार्थी आणि पर्यटकांना होणार आहे.

पुणे-शेगाव वंदे भारत ट्रेन: भक्तांसाठी खास सेवा ” :

या वंदे भारत ट्रेनचे थांबे दौंड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना येथे असण्याची शक्यता आहे. संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला जाणाऱ्या भाविकांसाठी ही ट्रेन विशेष उपयुक्त ठरणार आहे. पारंपरिक धार्मिक प्रवास आता जलद आणि अधिक आरामदायक होणार आहे. (Pune 4 vande bharat trains)

तसेच पुणे-वडोदरा ट्रेन लोणावळा, पनवेल, वापी, सुरत येथे थांबू शकते. सध्या पुणे-वडोदरा प्रवासात सुमारे ९ तास लागतात, मात्र वंदे भारत ट्रेनमुळे हा प्रवास ६ ते ७ तासांमध्ये पूर्ण होईल. मुंबई-पुणे-गुजरात या कॉरिडॉरमधील रेल्वे संपर्क अधिक मजबूत होणार असून व्यावसायिक प्रवाशांना याचा थेट फायदा होणार आहे.

Pune News | पुणे-सिकंदराबाद वंदे भारत: आयटी आणि उद्योग क्षेत्राला फायदा :

ही ट्रेन दौंड, सोलापूर, गुलबर्गा या मार्गांवर थांबेल अशी शक्यता आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणा यामधील रेल्वे संपर्क वाढणार असून तांत्रिक, व्यवसायिक व आयटी क्षेत्रातील लोकांना जलद प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

दरम्यान, पुणे-बेळगाव ट्रेन सातारा, सांगली, मिरज येथे थांबेल. यामुळे पुणेचा कर्नाटकच्या उत्तर भागाशी संपर्क वाढणार आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना २-३ तासांचा वेळ वाचणार असून पर्यटन, शिक्षण व व्यापारासाठी ही ट्रेन फायदेशीर ठरणार आहे. (Pune 4 vande bharat trains)

याशिवाय रेल्वे मंत्रालयाने पुणे-नागपूर स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. या ट्रेनद्वारे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे आणि उपराजधानी नागपूर एकत्र जोडली जाणार आहे. याचा फायदा व्यावसायिक, विद्यार्थी आणि पर्यटकांना होईल. स्लीपर प्रकारामुळे रात्रीचा प्रवास सोपा आणि आरामदायक होईल.

News Title: Pune to Get 4 Vande Bharat Trains and 1 Sleeper Vande Bharat – Route, Stops & Benefits Explained

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now