प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी! महाराष्ट्रातील ‘हा’ महत्त्वाचा महामार्ग सहापदरी होणार

On: December 5, 2025 10:42 AM
Mumbai Goa Highway
---Advertisement---

Pune Satara Highway | केंद्रीय विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना आज महाराष्ट्रासाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी लोकसभेत राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या प्रलंबित कामांबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी राज्यातील एक प्रमुख चारपदरी महामार्ग आता सहापदरी करण्यात येणार असून याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारने मंजूर केल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले आहे.

दरम्यान, राज्यात लवकरच होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या घोषणेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रातील मोठ्या प्रलंबित मार्गांच्या कामांबाबत चौकशी होत असताना गडकरी यांनी कामांची प्रगती, विलंबाची कारणे आणि आगामी आराखडा याबाबत सविस्तर उत्तर दिले आहे. तसेच त्यांच्या या निवेदनामुळे अनेक प्रकल्पांच्या पूर्णतेची वेळ निश्चित झाली असून वाहनचालकांसाठी सुविधा देखील वाढणार आहेत. (Maharashtra Highway Expansion)

तीन महत्त्वाच्या मार्गांच्या कामांना वेग :

शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी सभागृहात पुणे – सातारा – कोल्हापूर मार्गातील (Pune-Satara-Kolhapur Highway) विलंबाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना नितीन गडकरी यांनी सांगितले की पुणे ते सातारा मार्गाचे काम रिलायन्स कंपनीकडून काढून घेण्यात आले असून आता विभागाने त्याचा नव्याने आढावा सुरू केला आहे. याशिवाय खंबाटकी घाटातील नव्या बोगद्यांपैकी एकाचे काम पुढील आठवड्यातील उच्चस्तरीय बैठकीनंतर सुरू होणार आहे.

तसेच या मार्गावरील संपूर्ण काम पुढील बारा महिन्यांत पूर्ण होणार असल्याचा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, हा मार्ग तयार झाल्यानंतर प्रवाशांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुकर होणार आहे. यामुळे पुणे-सातारा-कोल्हापूर दरम्यान प्रवास करणाऱ्यांना सर्वात मोठा दिलासा मिळणार आहे.

Pune Satara Highway | मुंबई-गोवा महामार्ग एप्रिल 2026 पर्यंत सुरु होणार? :

यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind sawant) यांनी मुंबई-गोवा महामार्गाबाबत प्रश्न विचारला असता, एप्रिल 2026 पर्यंत हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प पूर्ण होईल असे गडकरी यांनी सांगितले. 2009 पासून सुरू असलेल्या या प्रकल्पात कंत्राटदार बदल, जमीन अधिग्रहणातील अडचणी आणि तांत्रिक कारणांमुळे मोठा विलंब झाला. तरीसुद्धा सध्या 89% काम पूर्ण झाले असून उर्वरित काम युद्धपातळीवर सुरू आहे.

दरम्यान, धुळे लोकसभा (Dhule Loksabha) मतदारसंघातील काँग्रेस खासदार शोभा बच्छाव यांनी विचारलेल्या धुळे-पिंपळगाव राष्ट्रीय महामार्गाबाबत गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मार्गाचे तिसरे नूतनीकरण जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण होईल. यासंर्भात अधिकृत अंतिम मुदत एप्रिल 2026 असली तरी काम आधी पूर्ण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हा मार्ग सध्या चारपदरी असून, लवकरच सहापदरी करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी मार्गाचा विस्तार अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

News Title: Major Maharashtra Highway to Be Expanded from Four Lanes to Six; Nitin Gadkari Confirms Approval in Parliament

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now