Pune Rave Party | पुण्यातील खराडी परिसरात अलीकडेच उघडकीस आलेल्या रेव्ह पार्टी प्रकरणाने राज्यात खळबळ उडवली आहे. या प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक झाल्याने राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. मात्र आता या प्रकरणात आणखी एक नवा ट्विस्ट समोर आला आहे — तो म्हणजे या आधी एप्रिल आणि मे महिन्यातही याच हॉटेलात हाऊस पार्टी झाल्याचा तपशील. (Pune Rave Party)
स्टे बर्ड हॉटेलवर लक्ष, एप्रिल-मे पार्टींचा तपास सुरू :
खराडीतील स्टे बर्ड हॉटेल हेच ठिकाण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. पोलिस सूत्रांनुसार, एप्रिल 2025 मध्ये ६ जणांसाठी ३ रुम बुकिंग करण्यात आलं होतं. मे 2025 मध्ये २ जणांसाठी २ रुम बुकिंग झालं होतं
या दोन्ही महिन्यातही “हाऊस पार्टी” झाल्याचा संशय व्यक्त होत असून, आता त्या पार्टींमध्ये कोण सहभागी होते, कुठून आले होते आणि ड्रग्जचा वापर झाला होता का? याचा तपास सुरू करण्यात आला आहे.
Pune Rave Party | पोलिसांची पाळत का? खडसेंचा गंभीर आरोप :
प्रांजल खेवलकर अटकेनंतर एकनाथ खडसे यांनी थेट पुणे पोलिसांवरच संशय व्यक्त केला आहे. त्यांचा दावा आहे की, “माझ्या कुटुंबाला बदनाम करण्यासाठीच पाळत ठेवली जात होती. प्रांजल कधीही ड्रग्जच्या संपर्कातही नव्हता. त्याला फसवण्यात आलं.” खडसे यांनी कोणत्याही मंत्र्यावर आरोप न करता पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. (Pune Rave Party)
या प्रकरणावर संजय राऊत यांनी गिरीश महाजनांवर टीका करत विरोधकांवर निशाणा साधला होता. त्यामुळे आता हे प्रकरण केवळ कायदेशीर चौकशीपुरतं मर्यादित राहील की राजकीय धग वाढणार?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.






