Pune Power Cut | पुणे शहरात आज (गुरुवारी) महावितरणकडून देखभाल व दुरुस्ती कामांसाठी तब्बल 7 तासांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. सकाळी 10.30 वाजल्यापासून सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत शहराच्या निम्म्या भागात ‘बत्ती गुल’ राहणार असल्याने नागरिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
मध्यवर्ती भागांसह उपनगरातील अनेक व्यावसायिक व निवासी परिसर या वीजखंडिततेच्या कक्षेत येणार आहेत. पावसाळ्यापूर्वीची पूर्वतयारी आणि वीजवाहिन्यांच्या अत्यावश्यक दुरुस्तीसाठी हे काम हाती घेण्यात आल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली महत्त्वाची कामे आधीच उरकून ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Pune Power Cut)
या मध्यवर्ती भागात वीजपुरवठा बंद राहणार :
सदाशिव पेठ, शुक्रवार पेठ, बुधवार पेठ, लक्ष्मी रोड, बाजीराव रोड, टिळक रोड, पेरूगेट, फरासखाना, जोगेश्वरी परिसर, श्रीनाथ थिएटर, कुमठेकर रोड, वाडिया हॉस्पिटल आणि टेलिफोन एक्सचेंज परिसरात आज दिवसभर वीजपुरवठा खंडित राहणार आहे.
तसेच एस.पी. कॉलेज, न्यू इंग्लिश स्कूल, अभिनव कॉलेज, भारती विद्यापीठ भवन, जेएसपीएम कॉलेज आणि झिल कॉलेज परिसरातील नागरिकांनाही या वीजबंदचा फटका बसणार आहे.
Pune Power Cut | उपनगरांसह इतर भागांनाही बसणार फटका :
नवी पेठ, शनिवार पेठ, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, गांजवे चौक, रामबाग कॉलनी, सेनादत्त पोलीस चौकी परिसरात वीजपुरवठा बंद राहणार आहे. धायरी, नऱ्हेगाव, भूमकर चौक, अष्टविनायक इंडस्ट्रियल एरिया, पारि कंपनी चौक, स्वामीनारायण मंदिर परिसर आणि आनंदनगर या उपनगरांनाही या कामाचा परिणाम होणार आहे. (Pune Power Cut News)
याशिवाय जनता वसाहत (गल्ली नं. 50 ते 109 आणि 122), चुना भट्टी, एकता नगरी, संतोष हॉल चौक, वैकुंठ स्मशानभूमी आणि पुना हॉस्पिटल परिसरातही वीज खंडित राहील. महावितरणने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, काम वेळेआधी पूर्ण झाल्यास पुरवठा लवकर सुरू केला जाईल, असेही स्पष्ट केले आहे.






