Pune Porsche Car Accident | पुण्यातील कल्याणी नगरमध्ये झालेल्या अपघाताची राज्यभर चर्चा रंगली आहे. पुण्यातील बिल्डरच्या अल्पवयीन 17 वर्षीय मुलगा वेदांत अग्रवालने दोन जणांना आपल्या कारने धडक देत संपवलं. त्यातच त्याला 15 तासांच्या आतच जमीनही देण्यात आला. यामुळे हे प्रकरण अजूनच चिघळलं आहे.
राज्यभरातून वेदांत अग्रवालवर कारवाईची मागणी केली जात आहे.अशात वेदांत याचा ड्रिंक करत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. कॉँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी हा व्हिडिओ पोस्ट केलाय.
आरोपीचं पबमधील CCTV फुटेज समोर
“व्यवस्थेला पैश्यांची टेस्ट आवडली ,मग मुलाची Alcohol test निगेटिव्ह आली. माणूस म्हणवण्याच्या देखील लायकीचे नाहीत ही लोकं”, असं ट्विट रवींद्र धंगेकर यांनी केलं आहे. त्यासोबतच त्यांनी एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. यामुळे पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. कारण, पोलिसांनी आरोपी मुलाची अल्कोहोल चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल दिलाय.
आरोपी अल्पवयीन असलेला मुलगा दारू पीत असल्याचे CCTV फुटेज असूनही अल्कोहोल चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल दिल्याने तपासावर प्रश्न केले जात आहेत. नागरिकांकडून यावर संताप व्यक्त केला जातोय. दरम्यान, या घटनेनंतर वेदांत अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे. यासोबतच वेदांत (Pune Porsche Car Accident )हा बार आणि पबमध्ये गेला होता. त्यावेळी प्रवेश देणाऱ्या हॉटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा, हॉटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे, व्यवस्थापक सचिन काटकर, बार व्यवस्थापक जयेश बोनकर यांच्याविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय.
व्यवस्थेला पैश्यांची टेस्ट आवडली ,मग मुलाची Alcohol test निगेटिव्ह आली.
माणूस म्हणवण्याच्या देखील लायकीचे नाहीत ही लोकं.#justicefor_anishashwini https://t.co/IS1Zw6znX2— Ravindra Dhangekar Official (@DhangekarINC) May 21, 2024
अल्पवयीन आरोपी मुलाच्या वडिलांना अटक
यासोबतच वेदांतने जी कार चालवली ती विनाक्रमांकाचीच (Pune Porsche Car Accident ) होती. पोर्शे कार बंगळुरुमध्ये तात्पुरती नोंदणी करुन पुणे येथे आणण्यात आली होती. त्यानंतर मार्च महिन्यामध्ये नोंदणी करण्याची प्रक्रिया पुण्यातील प्रादेशिक कार्यालयात सुरु होती. मात्र ती पोर्शे कार अजूनपर्यंत रजिस्टर नव्हती.त्यामुळे पुणे पोलिसांवर सवाल केले जात आहेत.
दोन जणांना जीव घेणारा आरोपी इतक्या लवकर जामीनावर बाहेर आल्याने लोकांमध्ये संताप निर्माण झालाय. यामुळे महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं जातंय.
News Title – Pune Porsche Car Accident CCTV footage of the accused
महत्त्वाच्या बातम्या-
सचिन तेंडुलकरवर गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा इशारा, म्हणाले…
‘…तर सगळे पब, बार बंद करा’; देवेंद्र फडणवीसांचे पुणे पोलिसांना आदेश
गजानन किर्तीकरांचं पुत्रप्रेम अखेर समोर; अगोदर लेकाविरोधात प्रचार केला, आता म्हणतात…
“जुन्या आठवणी विसरणं माझ्यासाठी..”; सलमान अजूनही एक्स गर्लफ्रेंडच्या प्रेमात?
‘मी दारु पितो हे पप्पांना माहिती आहे, तरी त्यांनी…’; लेकामुळे बाप अडचणीत






