Andekar Gang | आयुष कोमकर (Aayush Komakar) हत्याकांडानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या खुनामागे कुख्यात आंदेकर टोळी असल्याचे समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी या टोळीविरुद्ध मोठी मोहीम हाती घेतली आहे. अटक, चौकशी आणि आधीच दाखल गुन्ह्यांबरोबर आता पोलिसांनी आणखी दोन गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.
आंदेकर टोळीवर लागला मोक्का :
मिळालेल्या माहितीनुसार, समर्थ पोलीस ठाण्यात आंदेकर टोळीविरुद्ध अनधिकृत बांधकाम आणि तब्बल दीड कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी गुन्हे नोंदवले गेले आहेत. 2017 पासून एका व्यावसायिकाला धमकावून पैशांची उकळपट्टी करण्यात आल्याचे पोलिस तपासात उघड झाले. व्यवसायात अडथळे येऊ नयेत आणि टोळीकडून ‘प्रोटेक्शन’ मिळावे, या कारणावरून ही रक्कम मागण्यात आली होती.
याआधीच बंडू आंदेकरसह (Bandu Andekar) 20 जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तरीही नव्या तक्रारी आणि पुराव्यांमुळे पोलिसांनी आणखी गुन्हे दाखल करत टोळीवर कारवाईचा पवित्रा अधिक कडक केला आहे.
Andekar Gang | आंदेकर टोळीचे आणखी कारनामे उघड होण्याची शक्यता :
आता पोलिसांचा तपास वेगाने सुरू असून, या तपासातून आंदेकर टोळीचे आणखी गुन्हेगार कारनामे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पुण्यात आंदेकर गँगला पूर्णपणे चिरडण्याची तयारी पोलिसांनी सुरू केल्याचे स्पष्ट होत आहे.
वनराज आंदेकर यांच्या खुनानंतर आंदेकर (Andekar Gang) आणि कोमकर टोळीत (Komkar Gang) गॅंगवॉर सुरु झाले. पुढे आंदेकर यांच्या खुनानंतर आयुष कोमकर याचा खून करण्यात आला.






