Pune News | पुण्यातील (Pune) कोंढवा (Kondhwa) परिसरात एका डिलिव्हरी बॉयने घरात घुसून आयटी तरुणीवर बलात्कार केल्याच्या खळबळजनक प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले आहे. पुणे पोलिसांच्या (Pune Police) तपासात ही तक्रारच खोटी असल्याचे उघड झाले असून, तरुणीने आपल्याच प्रियकरावर सूड उगवण्यासाठी हा बनाव रचल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे ‘लव्ह, सेक्स अन् धोका’ असा प्रकार उघडकीस आला आहे.
नक्की काय आहे प्रकरण?
कल्याणीनगर (Pune News) येथील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. एका कुरिअर बॉयने घरात घुसून चेहऱ्यावर स्प्रे मारला आणि बलात्कार केल्याची तक्रार तिने केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या पुणे दौऱ्यामुळे पोलीस दलावर मोठा दबाव होता. त्यामुळे, या प्रकरणाच्या तपासासाठी पुण्यापासून दिल्लीपर्यंत तब्बल २०० पोलिसांचे पथक कार्यरत होते. पोलिसांनी शेकडो सीसीटीव्ही फुटेज, हजारो कॉल रेकॉर्ड्स आणि सर्व प्रमुख कुरिअर कंपन्यांची माहिती तपासली.
पोलिसांच्या सखोल तपासात या प्रकरणामागील धक्कादायक सत्य समोर आले. आरोपी कुरिअर बॉय नसून तरुणीचा प्रियकरच असल्याचे निष्पन्न झाले. दोघे दीड वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते आणि त्यांचे कुटुंबीयही एकमेकांच्या परिचयाचे होते. तो तिच्या घरी जाताना सोसायटीच्या रजिस्टरमध्ये नोंद होऊ नये म्हणून नेहमी ‘कुरिअर बॉय’ असल्याचे सांगायचा आणि तरुणी फोनवर त्याला दुजोरा द्यायची.
घटनेच्या दिवशी काय घडलं?
घटनेच्या दिवशी तो नेहमीप्रमाणे तिच्या घरी (Pune News) आला होता. त्यावेळी त्याने शारीरिक संबंधांची मागणी केली, मात्र तरुणीने मासिक पाळीचे कारण देत नकार दिला. यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि त्याने तिच्यावर जबरदस्ती केली, ज्यात त्यांच्यात अर्धवट शारीरिक संबंध झाले. या प्रकारामुळे चिडलेल्या तरुणीने प्रियकराला धडा शिकवण्यासाठी अनोळखी कुरिअर बॉयवर बलात्काराची खोटी कहाणी रचली. पोलिसांना पुरावा मिळू नये म्हणून तिने स्वतःच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधील सर्व डेटाही डिलीट केला होता.
या तक्रारीची माहिती नसलेला तिचा प्रियकर कुटुंबीयांसोबत एका लग्नसमारंभात सहभागी झाला होता. पोलिसांनी त्याला लग्नाच्या ठिकाणाहूनच चौकशीसाठी ताब्यात घेतले, तेव्हा हा सर्व बनाव उघड झाला. तरुणीनेच खोटी फिर्याद दिल्याचे स्पष्ट झाल्याने या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे.
News Title – Pune News Woman Files False Rape Case






