कोंढवा प्रकरणात तरुणीनेच केला भयंकर बनाव, धक्कादायक खुलाशाने पोलिसही हादरले

On: July 5, 2025 3:42 PM
Pune news
---Advertisement---

Pune News | पुण्यातील (Pune) कोंढवा (Kondhwa) येथील संगणक अभियंता तरुणीवरील बलात्कार प्रकरणात दररोज नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर, त्याने मोबाईलमध्ये काढलेला सेल्फी तरुणीनेच एका ॲपद्वारे एडिट करून त्याखाली ‘मैं वापस आऊंगा’ असा धमकीवजा मेसेज लिहिल्याचे तपासात उघड झाले आहे. तरुणीने स्वतः याची कबुली पोलिसांना दिली आहे.

तरुण हा तरुणीचा मित्र-

या प्रकरणात ताब्यात घेतलेला तरुण हा तरुणीचा मित्र असून, त्याने आपल्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याच्या दाव्यावर तरुणी ठाम आहे. मात्र, तरुणाने आपण तिच्या बोलावण्यावरूनच घरी गेल्याचा दावा केला असून, दोघांमधील व्हॉट्सॲप चॅटिंगही (WhatsApp Chatting) पोलिसांना मिळाले आहे. तपासात बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रेचा वापर झाला नसल्याचेही स्पष्ट झाले आहे, ज्यामुळे तरुणीने रचलेला बनाव पूर्णपणे उघड झाला आहे.

संशयास्पद प्रतिक्रियेमुळे पोलिसांना खात्री-

या घटनेने शहरात महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण करत मोठी खळबळ उडवून दिली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे पोलिसांनी (Pune Police) २२ पथके तयार केली होती. तब्बल ५०० पोलिसांनी कोंढवा ते बाणेरपर्यंतचे ५०० सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Cameras) तपासले. आरोपी तरुणाचा फोटो सोसायटीतील कॅमेऱ्यात कैद झाला होता. हा फोटो ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) वैद्यकीय तपासणीदरम्यान तरुणीला दाखवला असता, तिने दीड मिनिटे शांत राहून नंतर त्याला ओळखण्यास नकार दिला. तिच्या याच संशयास्पद प्रतिक्रियेमुळे पोलिसांना ती खोटे बोलत असल्याची खात्री पटली.

आरोपी तरुण एका बहुराष्ट्रीय कंपनीत चांगल्या पदावर असून, तो तरुणीच्या एका वर्षापासून संपर्कात होता. त्यांची ओळख एका सामाजिक मेळाव्यात झाली होती. तांत्रिक तपासात तो तरुणीला अनेकदा फूड डिलिव्हरी ॲपवरून जेवण पाठवत असल्याचेही समोर आले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी स्वतः दोन वेळा कोंढवा पोलीस ठाण्यात भेट देऊन तपासाचा आढावा घेतला होता. पोलिसांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर या खोट्या तक्रारीमागील सत्य उघड झाले.

News Title – Pune news Woman Admits Faking Rape Evidence

 

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now