Pune News | नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सोमवारपासून विमाननगर चौकातून उजवीकडे वळण्यास बंदी घालण्यात आली आहे.
विमाननगरकडून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांना आता सोमनाथनगर चौकातून वळून जावे लागणार आहे. तसेच, नगरहून येणाऱ्या आणि विमाननगरकडे जाणाऱ्या वाहनांना लष्कराच्या अग्निबाझ केंद्रासमोरून ‘यू टर्न’ घ्यावा लागेल.
वाहतूक कोंडी कमी होईल
हा बदल प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आला आहे. नागरिकांच्या या बदलासंदर्भातील हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत.
या बदलामुळे नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल, असा विश्वास वाहतूक पोलिसांनी व्यक्त केला आहे. नागरिकांनी या बदलाला सहकार्य करण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
Title : Pune News viman nagar chowk right turn ban traffic changes






