Pune News: पुण्यातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी कायमस्वरूपी वाहतूक आयुक्त नेमावा, सुनील माने यांची मागणी

On: January 18, 2024 8:51 AM
pune news
---Advertisement---

Pune News | एस्कॉर्टिंग साठी स्वतंत्र पोलीस बंदोबस्त नेमावा तसेच शहरासाठी स्वतंत्र आरोग्यप्रमुख नेमावा अशी मागणी मी पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे आज केली. याबाबतचे पत्र त्यांना ई-मेल द्वारे पाठवले आहे, असं भाजप नेते सुनील माने यांनी सांगितलं आहे.

पुणे शहरात मेट्रो(Pune Metro), दोन रिंग रोड(Pune Ring Road), हायवे, विमानतळ, त्याचबरोबर वाहतुकीचे वेगवेगळे प्रकल्प सुरु आहेत. शहरातील वाहन आणि रस्ते यांच्या व्यस्त प्रमाणामुळे संपूर्ण शहरात वाहतुकीच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. आगामी काळात शहराला(Pune News) परिपूर्ण बनवण्यासाठी संपूर्ण वाहतुकीची जबाबदारी सक्षम आय.ए.एस किंवा आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत पार पाडली जावी, असं त्यांनी म्हटलं आहे.

आणखी काय म्हणाले सुनील माने?

“पुण्यात खून, हाणामारी, सायबर गुन्हे अशा घटना वाढीस लागत आहेत. यामुळे पुण्याची सांस्कृतिक शहर (Pune News) ही ओळख पुसली जाऊन गुन्हेगारीचे शहर ही ओळख निर्माण होते की काय अशी भीती निर्माण होऊ लागली आहे. गेल्या वर्षभरात व्हीआयपी मुव्हमेंट, त्यांचा बंदोबस्त, एस्कॉर्टिंग याचा पुणे पोलिसांवर मोठा ताण असल्याचे दिसत आहे.”

“गुन्हेगारीला अटकाव करण्यासाठी पोलीस यंत्रणेवरील ताण कमी करून बंदोबस्त आणि या गोष्टींसाठी नेहमीच्या पोलीस दलाचा वापर न करता त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची पुणे शहराला गरज आहे. त्यातून शहराच्या कायदा सुव्यवस्थेमुळे पोलीस दलाचे गुन्हेगारी कमी करण्यात आणि कायदा सुव्यवस्था राखण्यास मदत होईल.”

शहराला आरोग्यप्रमुख सुद्धा हवा!

“कोव्हीड सारख्या एखाद्या जागतिक महाभयंकर आजाराला तोंड देण्यासाठी आजही आपल्याकडे अस्तित्वात असलेला साथरोग नियंत्रित कायदा इंग्रजकालीन आहे. त्यामुळे पुणे शहराची व्याप्ती लक्षात घेता आता संपूर्ण शहराला एकत्र आरोग्यप्रमुख नेमण्याची तसेच शहराचे आरोग्य विषयक सर्व अधिकार त्यांच्याकडे देण्याची आवश्यकता आहे.”

“वैद्यकीय माहितीच्या अनुसार या क्षेत्रातील काम डॉक्टर असलेल्या अधिकाऱ्यास आरोग्य प्रमुख करणे योग्य ठरेल याबाबत आपण सकारात्मक विचार करावा अशी विनंती मी आज पालकमंत्र्यांकडे केली आहे, असं सुनील माने(Sunil Mane) यांनी सांगितलं आहे.

News Title: Pune News Sunil Mane on traffic issue

महत्त्वाच्या बातम्या-

Nuclear Battery Technology l ऐकावं ते नवलच!, एकदा फोन चार्ज केला की 50 वर्षे चालणार बॅटरी

Ram Mandir | 22 जानेवारीला पाच राज्यातील शाळांना सुट्टी, पाहा यादी

Central Government Alert On Cyber Crime l सरकारकडून मोठा इशारा!, विना OTP बँक अकाऊंट होतायेत खाली, चुकूनही करु नका ‘या’ गोष्टी

Viral Video । छोट्या हत्तीवर घेऊन चाललेत मोठा हत्ती, व्हिडीओ पाहून लोक झालेत हैराण!

Female Teacher Sexually Abused 15 Year Old Student l 15 वर्षाच्या मुलासोबत शिक्षिकेनं ठेवले शारीरिक संबंध, असले मेसेज समोर आल्याने उडाली खळबळ

Krishna Varpe

Mahesh Patil

Join WhatsApp Group

Join Now