‘मी दारु पितो हे पप्पांना माहिती आहे, तरी त्यांनी…’; लेकामुळे बाप अडचणीत

On: May 21, 2024 5:44 PM
Pune Porsche Accident
---Advertisement---

Pune News | पुण्यात (Pune News) भरधाव वेगात गाडी चालवून दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलांला 15 तासात जामीन मिळाल्यानंतर संतापाची लाट उसळली होती. यानंतर पुणे पोलिसांनी कारवाई करत भरधाव वेगात गाडी चालवून दोघांचा जीव घेणाऱ्या मुलाचे वडील आणि बांधकाम व्यायवसायिक विशाल अग्रवाल यांना पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केलीय. जी.एम प्लाझा लॉजिंग अँड रेस्टॉरंटमधून पुण्याचे उद्योजक विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आलीये.

लेकामुळे बाप अडचणीत

विशाल अग्रवाल हे पुण्यातील ब्रह्मा कॉर्प या बांधकाम उद्योग समुहाचे प्रमुख आहेत. मुलगा अल्पवयीन असूनही त्याला कार चालवायला दिल्याबद्दल विशाल अग्रवाल यांच्यावर मोटर वाहन अधिनियमाच्या कलम 3, 5 आणि 199 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता या प्रकरणी मुलाने पोलिसांसमोर सगळंच सांगितलं आहे. मुलाचे वडिल विशाल अग्रवाल आणखीन अडचणीत सापडले आहेत.

Pune News | “मी दारु पितो हे पप्पांना माहिती आहे”

मी दारु पितो हे पप्पांना माहिती आहे. मी ड्रायव्हिंगचं ट्रेनिंग घेतलं नाही. माझ्याकडे लायसन्स नाही तरीही मला पप्पांनी गाडी चालवायला दिली, असं वेदांत अग्रवालने पोलिसांनी सांगितलं आहे.

वेदांत शनिवारी रात्री मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेला होता. पार्टला जाताना वडिलांची आलीशान पॉर्शे कार घेऊन तो गेला. पार्टी संपवून वेदांत ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि ड्रायव्हरला शेजारी बसवले. त्याचे दोन मित्र देखील गाडीत मागे बसलेले होते. दारूच्या नशेत वेदांतने गाडीचा स्पीड वाढवला , ट्रम्प टॉवर समोर आल्यानंतर त्याचा कंट्रोल सुटला आणि त्याने समोरच्या पल्सरला धडक दिली.

अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा असे दोघेही आयटी अभियंते होते. हे दोघे आपल्या मित्रांसोबत पार्टी करुन घरी चालले होते. पण वेदांत अग्रवालच्या भरधाव वेगानं त्यांना अक्षरश: चिरडलं

दरम्यान, सामान्य जनतेमध्ये या घटनेचे संतप्त पडसाद उमटले आहेत. यामुळे हे प्रकरण आणखी तापलं आहे. पोलिसांनी (Pune Police) चुकीचा तपास केला, पैशांची सेटलमेंट केली असा आरोप विरोधकांकडून करण्यात आलाय.

महत्त्वाच्या बातम्या- 

“नवऱ्याने एकनाथ शिंदेंसोबत जाऊन त्यांना सलाम ठोकणं मला अजिबात पटलं नाही”

पुणे अपघात प्रकरणी पोलीस आयुक्तांचा मोठा खुलासा!

कॅटरिना कैफने दिली गुड न्यूज?; बेबी बंप लपवतानाचा नवा Video समोर

पुणे अपघात प्रकरणाला नवं वळण; ‘या’ नेत्याचा गंभीर आरोप

मुंबई, ठाण्यात उष्णतेची लाट तर ‘या’ भागाला अवकाळी झोडपणार

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now