Pune News | पुण्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी (Pune Police) कठोर पावले उचलली आहेत. आंदेकर गँगचा म्होरक्या बंडू आंदेकर आणि घायवळ गँगचा (Ghaywal Gang) म्होरक्या निलेश घायवळ यांच्यानंतर आता टिपू पठाण टोळीतील गुन्हेगारांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. हडपसर परिसरात बनावट कागदपत्रांद्वारे (Fake Documents) बेकायदेशीर बांधकाम (Illegal Construction) करून नागरिकांकडून (Citizens) लाखो रुपये उकळणाऱ्या रिझवान ऊर्फ टिपू सत्तार पठाण (Rizwan alias Tipu Sattar Pathan) आणि त्याच्या टोळीतील साथीदारांवर काळेपडळ पोलिसांनी (Kalepadal Police) धडक कारवाई केली आहे.
टिपू पठाणच्या घरातून लाखोंचा मुद्देमाल जप्त, बिल नाही
या कारवाईत पोलिसांनी आरोपींची बँक खाती गोठवली असून, अनधिकृत बांधकामे तोडण्याची कारवाईही सुरू केली आहे. काळेपडळ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी टिपू पठाण याच्या नावावरील मोटार पोलिसांनी जप्त केली आहे. पठाण आणि त्याचे साथीदार सादिक कपूर (Sadiq Kapoor), एजाज पठाण, मेहबूब शेख, जावेद शेख, मुनीर शेख आदींची बँक खाती गोठविण्यात आली असून, संशयित आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू आहे.
आरोपींच्या घरांची झडती घेताना पोलिसांना (Pune Police) पंखे (Fans), एसी (AC), टीव्ही (TV), फ्रिज (Fridge), वॉशिंग मशिन (Washing Machine), फर्निचर (Furniture) आदी चार ते पाच लाख रुपये किमतीच्या वस्तू आढळल्या. या वस्तूंची बिले मागवण्यात आली असता आरोपींच्या नातेवाइकांकडे त्याची कागदपत्रे नव्हती. झडतीदरम्यान दोन नोटरीकृत साठेखत (Notarized Sale Deeds) सापडले आहेत. गुंड पठाण (Tipu Pathan) याच्यासह साथीदारांची बँक खाती गोठविण्यात आली आहेत. काळेपडळ पोलिसांनी (Kalepadal Police) पठणसह (Tipu Pathan) साथीदारांच्या घराची झडती घेतली. तेथून जमीन व्यवहारासंदर्भातील कागदपत्रे (Land Deal Documents), महागडी मोटार (Expensive Motor Car), तीन दुचाकी (Three Two-Wheelers), तसेच गृहोपयोगी वस्तू (Household Items) असा मुद्देमाल (Evidence) जप्त करण्यात आला आहे.
बेकायदा बांधकामावर हातोडा
मिळालेल्या माहितीनुसार, टिपू पठाणने केलेल्या बेकायदा बांधकामावर काळेपडळ पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने नुकतीच कारवाई केली होती. या कारवाईत पठाणचे कार्यालय, तसेच बेकायदा बांधकाम पाडून टाकण्यात आले होते. या कारवाईनंतर पोलिसांनी पठाण याच्यासह दहा साथीदारांच्या घरावर छापा टाकला. त्यांच्या घरातून पंखे, टीव्ह, वॉशिंग मशिन, महागडे फर्निचर असा चार ते पाच लाख रुपयांचा मुद्देमाल (Evidence) जप्त करण्यात आला.
पठाण (Tipu Pathan) आणि साथीदारांच्या नातेवाईकांनी महागड्या गृहोपयोगी वस्तू खरेदीची बिले (Bills) सादर केली नाहीत. पोलिसांनी (Pune Police) पठाण (Tipu Pathan) याच्या घरातून दोन साठेखत जप्त केले आहेत, जे त्याच्या बेकायदेशीर व्यवहारांचे पुरावे (Evidence of Illegal Transactions) मानले जात आहेत. ही कारवाई पुण्यातील (Pune) गुन्हेगारीला आळा घालण्याच्या पोलिसांच्या (Pune Police) प्रयत्नांचा एक भाग आहे.






