दहशत माजवणाऱ्यांविरोधात पोलीस आयुक्त आक्रमक; वारजे माळवाडीत चार गुंडांना घडवली अद्दल

On: February 25, 2025 11:08 AM
Pune News MPDA Action Against Four Goons for Creating Terror in Warje Malwadi 
---Advertisement---

Pune News | पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात दहशत माजवणाऱ्या चार गुंडांविरोधात पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या गुंडांना वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे. (Pune News)

‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई

अभिजित ऊर्फ चौक्या तुकाराम येळवंड, ओंकार ऊर्फ टेड्या उमेश सातपुते, गौरव संजय शेळके आणि ओंकार ऊर्फ ढेण्या सुधाकर चौधरी अशी कारवाई करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत.

चौधरी अल्पवयीन असल्यापासून गंभीर गुन्हे करत आहे. त्याच्याविरोधात चार गुन्हे दाखल झाले आहेत. गेल्या दीड महिन्यात त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे दोन गुन्हे दाखल झाले.

कारागृहात रवानगी

त्याच्याविरुद्ध एमपीडीए कारवाई करण्याचा प्रस्ताव वारजे पोलिसांनी (Warje Police) तयार केला होता. पोलिस आयुक्तांनी प्रस्ताव मंजूर केला. पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार चौधरीची वर्षभरासाठी बुलढाणा (Buldhana) कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. चौधरी याच्यासह येळवंड, सातपुते, शेळके यांच्याविरुद्ध एमपीडीए कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांची कारवाई

पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित काईगडे, उपनिरीक्षक संजय नरळे यांच्यासह बालाजी काटे, सागर कुंभार, योगेश वाघ, निखिल तांगडे, शरद पोळ, गोविंद कपाटे, अमित शेलार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. (Pune News)

Title: Pune News MPDA Action Against Four Goons for Creating Terror in Warje Malwadi 

 

Join WhatsApp Group

Join Now