Maharashtra Weather Update | महाराष्ट्रातील मान्सूनची सक्रियता आता काहीशी कमी झाल्याचे चित्र आहे. राज्यातील अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली असून पुढील दोन ते तीन दिवस बहुतांश ठिकाणी हवामान तुलनेने कोरडे राहण्याचा अंदाज आहे. काही जिल्ह्यांत मात्र ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम सरी सुरू राहतील. सोमवारी काही भागांसाठी पावसासह वादळी हवामानाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर कमी :
गेल्या काही दिवसांपासून राज्यात प्रभावी असलेल्या मान्सूनचा (Monsoon) जोर आता ओसरताना दिसत आहे. जळगाव (Jalgaon), छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar), नाशिक (Nashik) घाटमाथा, पुणे (Pune) घाटमाथा याशिवाय अकोला (Akola), अमरावती (Amravati), नागपूर (Nagpur) आणि वर्धा (Wardha) या परिसरांतील काही ठिकाणी अद्याप पावसाच्या सरी सुरू आहेत. मात्र, राज्यातील इतर भागांत पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस नागरिकांना उष्णतेसोबत दमट वातावरणाचा अनुभव येण्याची शक्यता आहे.
मुंबई (Mumbai) आणि कोकण विभागातही पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली आहे. पालघर (Palghar), ठाणे (Thane), मुंबई, रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri) आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) या जिल्ह्यांत सध्या मोठ्या पावसाचा इशारा नाही. काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी कोसळू शकतात. मात्र जोरदार पावसाची शक्यता कमी असून या भागात ढगाळ वातावरणासह उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे.
Maharashtra Weather Update | 8 जिल्ह्यांत यलो अलर्ट; घाटमाथ्यावर जोरदार पाऊस :
उत्तर महाराष्ट्रात जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. यावेळी 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. धुळे (Dhule), नंदुरबार (Nandurbar) तसेच नाशिक घाटमाथ्यावर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम
महाराष्ट्रात पुणे घाटमाथ्यावरही यलो अलर्ट कायम असून घाट परिसरात जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे शहर, कोल्हापूर (Kolhapur), सातारा (Satara), सांगली (Sangli) आणि सोलापूर (Solapur) येथे मोठ्या पावसाचा इशारा नसला तरी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडू शकतात.






