पुणे पोलिसांच्या नाकावर टिच्चून!, दिवसा-ढवळ्या सोन्याच्या दुकानावर दरोडा

On: May 18, 2024 7:24 PM
Pune News jewelery shop looted
---Advertisement---

Pune News | सुसंस्कृत पुण्यात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत.ड्रग प्रकरण, गुंडाची हत्या, गोळीबार या सर्व प्रकारामुळे पुण्यात सुरक्षेचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. आता पुण्यात दरोडा टाकण्यात आल्याची घटना घडली आहे. दिवसा-ढवळ्या एका सराफा दुकानात हाती बंदुक घेऊन 6-7 जणांच्या टोळीने येथे दहशत माजवली.

पुण्यामधील वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या महंमदवाडी रस्त्यावर हा सर्व प्रकार घडला. सात जणांच्या अनोळखी टोळक्याने एका सराफा दुकानात दरोडा टाकून तब्बल 300 ते 400 ग्रॅम सोने लुटून नेल्याची घटना घडली आहे.

हाती बंदुक घेऊन सराफा दुकान लुटलं

या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. दुचाकीवरून आलेल्या टोळक्यानं बीजीएफ ज्वेलर्सवर दरोडा टाकत येथील सोने लुटून नेले आहे. या घटनेचा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलिस आता या फुटेजद्वारे दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.

पुण्यात असं दिवसाढवळ्या दरोड्याची घटना घडल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांकडून या प्रकरणी संताप व्यक्त केला जातोय. पोलिस आता या आरोपींचा (Pune News ) शोध घेत आहेत.संबंधित आरोपी कुठल्या गँगचे किंवा ग्रुपचे आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे.

पुण्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण

भर दिवसा हे दरोडेखोर हातात पिस्तुल घेऊन सराफा दुकानात घुसले. यांच्याकडे हे पिस्तुल आले कसे?, दिवसा अशा घटना घडत असतील तर, मग सुरक्षा यंत्रणा काय करत आहेत?, असे सवाल देखील आता नागरिक उपस्थित करत आहेत.

दर आठवड्यात असे नव-नवे प्रकरण समोर येत असल्याने पुण्यात सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. लोकसभेसाठी पोलिस यंत्रणा व्यस्त होती.पुण्यात मतदान पार पडलंय. आता (Pune News )पुन्हा गुन्हेगारीने डोकं वर काढल्याने पोलिसांपुढे मोठं आव्हान उभं राहिलं आहे.

News Title-  Pune News jewelery shop looted

महत्त्वाच्या बातम्या –

सुंदर आणि टवटवीत त्वचेसाठी व्हिटॅमिन C समृद्ध फळे खा!

‘जे मस्तीत वागतात त्यांची मस्ती…’; उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना उत्तर

“उद्या RSS लाही नकली म्हणतील”; उद्धव ठाकरे कडाडले

फुलांच्या माळाने स्वागत केलं नंतर थेट कानाखाली वाजवली; कॉँग्रेस नेत्याचा व्हिडिओ व्हायरल

‘आता फक्त पाडा म्हणालो, विधानसभेला तर…’; मनोज जरांगेंचा गंभीर इशारा

Join WhatsApp Group

Join Now