Pune News | एप्रिलच्या मध्यातच पुणेकरांना उष्णतेचा जबरदस्त चटका बसत असून, लोहगावमध्ये तापमान ४२.९ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने शहरात ‘हिटवेव अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. (Pune News )
पुण्यात तापमान ४२ अंशांवर
पुण्यात सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून (Shivajinagar) शिवाजीनगर आणि (Lohgaon) लोहगाव हवामान केंद्रांनी दिलेल्या अहवालानुसार तापमानाने ४२.१ अंश सेल्सिअसचा टप्पा पार केला आहे. दिवसा वाढलेल्या झळांमुळे केवळ कमाल तापमान नव्हे, तर किमान तापमानातही वाढ झाली आहे. त्यामुळे रात्रीसुद्धा उकाडा जाणवत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील ३ ते ४ दिवस पुण्यात तापमान ४० ते ४२ अंशांदरम्यान राहणार आहे.
हवामान विभागाने (India Meteorological Department) सांगितले की, २२ एप्रिलनंतर हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. परंतु त्याआधी नागरिकांनी दुपारी घराबाहेर न पडणे, हलका आहार घेणे, पाणी भरपूर पिणे यांसारख्या खबरदारी बाळगाव्यात.
‘या’ जिल्ह्यांनाही अलर्ट
१७ एप्रिल रोजी पुण्याच्या विविध भागांमध्ये नोंदवले गेलेले तापमान असे होते – शिवाजीनगर ४०.५ अंश, पाषाण ४०.४ अंश, लोहगाव ४२.९ अंश, चिंचवड ३९.२ अंश आणि मगरपट्टा ४० अंश. यातील लोहगावमध्ये सर्वाधिक तापमान नोंदवले गेले.
दरम्यान, मध्य महाराष्ट्रातील (Osmanabad) धाराशिव, (Latur) लातूर, (Nanded) नांदेड, (Hingoli) हिंगोली, (Beed) बीड, (Parbhani) परभणी, (Solapur) सोलापूर, (Satara) सातारा आणि पुणे या जिल्ह्यांना सुद्धा हिटवेव अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातही ४० ते ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत आहे. एप्रिलच्या अखेरीस हे तापमान ४५ ते ४६ अंशांपर्यंत पोहोचू शकते, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. (Pune News )
‘ही’ काळजी घ्या-
उन्हाळ्याच्या या तीव्रतेमध्ये नागरिकांनी दुपारी १२ ते ४ या वेळात घराबाहेर जाणे टाळावे, शक्यतो हलका आणि पचायला सोपा आहार घ्यावा. बाहेर जाताना डोकं आणि चेहरा पूर्णपणे झाकावा, छत्री किंवा टोपी वापरावी. लहान मुले, वृद्ध नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. पुरेसे पाणी आणि इतर द्रवपदार्थ घेतल्यास उष्माघात टाळता येऊ शकतो.
Title : Pune News Heatwave Alert Temperature Soars to 42.9°C






