पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलवर सुद्धा ‘डिजीयात्रा’ सुरू होणार!, हवाई वाहतूक मंत्र्यांनी तारीख सांगितली

On: January 31, 2025 6:45 PM
Pune News Airports New Terminal to Launch DigiYatra Service from February 8
---Advertisement---

Pune News | पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांच्या सोयीसाठी डिजीयात्रा (DigiYatra) प्रणाली ८ फेब्रुवारी २०२५ पासून नवीन टर्मिनलवर कार्यान्वित होणार आहे. केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत या सुविधेचा औपचारिक प्रारंभ केला जाईल. डिजीयात्रा प्रणालीमुळे विमानतळावरील तपासणी आणि बोर्डिंग प्रक्रिया वेगवान आणि सोयीस्कर होणार आहे. (Pune News )

तत्पूर्वी पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलवर डिजीयात्रा प्रणाली सुरु नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. यासंदर्भातील बातम्या झाल्यानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याची दखल घेतली आहे. तात्काळ याप्रकरणी पावलं उचलण्यात आली असून आता ८ फेब्रुवारीपासून पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलवर देखील प्रवाशांना डिजीयात्रा सेवेचा अनुभव घेता येणार आहे.

डिजीयात्रा प्रणालीमुळे प्रवाशांना कसा फायदा होईल?

डिजीयात्रा ही बायोमेट्रिक-आधारित सेल्फ-बोर्डिंग प्रणाली आहे, जी प्रवाशांना प्रवेशद्वारापासून (Entry Gate) विमानात बसण्यापर्यंतच्या सर्व प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यास मदत करते. फेशियल रिकग्निशन (Facial Recognition) तंत्रज्ञानाचा वापर करून ही सेवा अधिक सुरक्षित आणि सहज बनवण्यात आली आहे. पुणे विमानतळावर याआधी जुन्या टर्मिनलवर ही सेवा उपलब्ध होती, मात्र नव्या टर्मिनलवर ती प्रतिक्षेत होती. आता सर्व आवश्यक परवानग्या आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही सेवा कार्यान्वित होणार आहे.

डिजीयात्रा ही सेवा १ डिसेंबर २०२२ पासून देशभरात कार्यरत आहे. आतापर्यंत ८० लाखांहून अधिक प्रवासी या सुविधेशी जोडले गेले आहेत, तर ४ कोटींहून अधिक वेळा प्रवाशांनी ही सेवा वापरली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस डिजीयात्राचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. पुणे विमानतळावर मोठ्या प्रमाणात प्रवासी डिजीयात्राचा वापर करत असल्याने, ही सेवा सुरू झाल्यानंतर पुणेकर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे, असं केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. (Pune News )

डिजीयात्रा वापरण्याचे फायदे-

  • फेशियल रिकग्निशन तंत्रज्ञानामुळे वेगवान आणि सुरक्षित बोर्डिंग
  • लांबच लांब रांगा आणि वेळ वाया जाण्याची समस्या दूर
  • प्रवाशांना पेपरलेस आणि टचलेस अनुभव मिळणार
  • विमानतळ सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना

डिजीयात्रा प्रणालीमुळे पुणे विमानतळाचा अनुभव अधिक आधुनिक आणि सोयीस्कर होणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नागरी हवाई वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे. (Pune News )

Title: Pune News Airports New Terminal to Launch DigiYatra Service from February 8

 

Join WhatsApp Group

Join Now