पुणेकरांना महावितरणचा झटका, थकबाकीदार वीजग्राहकांविरोधात मोठी कारवाई

On: March 27, 2025 11:55 AM
Pune News 29000 Connections Cut Over Unpaid Bills
---Advertisement---

Pune News | पुणेकरांनी वीजबिलं न भरल्यास थेट वीजपुरवठा खंडित केला जातोय. महावितरण विभागाने 25 दिवसांत तब्बल 29 हजार वीजग्राहकांचे  कनेक्शन तोडलं आहे. शहरासह ग्रामीण भागातही ही मोहीम राबवली जात असून थकबाकी वसुलीसाठी विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. (Pune News)

थकबाकीदारांविरोधात महावितरणची मोहीम जोमात

महावितरण विभागाने पुणे विभागात थकबाकीदार वीजग्राहकांविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. गेल्या 25 दिवसांत वीजबिल न भरलेल्या तब्बल 29 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. या मोहिमेचा उद्देश प्रलंबित थकबाकी वसूल करणे हाच असून, घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांकडे एकत्रितपणे तब्बल 88 कोटी 45 लाख रुपयांची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे.

महावितरण विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार (Rajendra Pawar) यांनी सांगितलं की, वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विभागाला दरमहा येणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून राहावं लागतं. त्यामुळे थकबाकी वसुली अत्यावश्यक आहे. विभागाचे कर्मचारी वेगवेगळ्या भागांमध्ये दौरे करत थकबाकीदारांची यादी तयार करून त्यांच्यावर थेट वीजपुरवठा बंद करण्याची कारवाई करत आहेत. ग्राहकांनी वेळीच वीजबिल भरून ही कारवाई टाळावी, असं आवाहनही त्यांनी केलं.

शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागांत मोठा दंडुका

पुणे शहरात सध्या 40 कोटी 9 लाख रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. या भागात मागील 24 दिवसांत 10 हजार 177 ग्राहकांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांकडे 18 कोटी 40 लाख रुपयांची थकबाकी आहे आणि या भागात 7 हजार 796 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

महावितरण विभागाकडून ग्रामीण पुणे जिल्ह्यांमध्येही व्यापक कारवाई करण्यात आली आहे. आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, राजगड आणि हवेली या तालुक्यांतील थकबाकीदारांवरही वीजपुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू आहे. वीजबिल भरण्यासाठी महावितरणने (MSEDCL) आपली वेबसाइट आणि मोबाईल ॲपद्वारे ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे, ज्याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असंही पवार यांनी स्पष्ट केलं.

 Title : Pune News 29000 Connections Cut Over Unpaid Bills

 

Join WhatsApp Group

Join Now