पुणे निवडणुकीत कुख्यात गुंडाची एन्ट्री? गजा मारणेच्या ‘त्या’ फोन कॉलने खळबळ

On: January 8, 2026 1:48 PM
Pune Municipal Election
---Advertisement---

Pune Municipal Election | पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोथरूड परिसरात राजकीय हालचालींना वेग आला असून, कुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणे याच्या हालचालींमुळे पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. गजा मारणे याने काही नागरिकांना फोन कॉल केल्याची माहिती समोर आल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे.

महापालिका निवडणुकीत गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे (Jayshree Marane) उमेदवार असल्यामुळे या फोन कॉल्सकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा दबाव, हस्तक्षेप किंवा आचारसंहिता भंग होऊ नये, यासाठी कोथरूड पोलिसांकडून सतत नजर ठेवण्यात येत आहे.

‘त्या’ फोन कॉलमागे नेमकं काय कारण? :

मिळालेल्या माहितीनुसार, कोथरूड परिसरातून जयश्री मारणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गजा मारणे याने काही मतदारांशी थेट संपर्क साधल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. हे फोन कॉल्स पत्नीच्या प्रचारासाठी किंवा समर्थन मिळवण्यासाठी करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, या कॉल्समुळे काही मतदारांवर अप्रत्यक्ष दबाव येत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे पोहोचल्या आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता, गजा मारणे याच्या प्रत्येक हालचालीवर पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवले जात असून, कॉल डिटेल्सचीही चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.

Pune Municipal Election | पोलिस प्रशासनाची भूमिका काय? :

पुणे महापालिका निवडणूक (Pune Mahapalika Election) शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी पुणे पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत. कोथरूड परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून, परिस्थितीवर सतत नजर ठेवली जात आहे. (Pune Municipal Election)

या प्रकरणावर बोलताना पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश गुप्ता यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, निवडणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारचा दबाव, धमकी किंवा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. गजा मारणे (Gaja Marne) याच्या हालचालींवर सध्या करडी नजर ठेवण्यात आली असून, आचारसंहिता भंग झाल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे पुणे महापालिका निवडणुकीदरम्यान या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळासह पोलिस प्रशासनाचे लक्ष लागून राहिले आहे.

News Title : Pune Municipal Election: Police Probe Gaja Marne’s Phone Calls, Kothrud Police on High Alert

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now