पुणे म्हाडा लॉटरी 2025: कोणाला करता येणार अर्ज? जाणून घ्या उत्पन्नाचे गट आणि आवश्यक कागदपत्रे

On: September 15, 2025 10:38 AM
MHADA Lottery 2025
---Advertisement---

Pune MHADA Lottery | पुणे म्हाडा मंडळाकडून जाहीर करण्यात आलेल्या 2025 च्या लॉटरीत एकूण 6168 घरे उपलब्ध असून त्यातील 1982 घरे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर देण्यात येणार आहेत. अनेकांना प्रश्न पडतो की या लॉटरीसाठी कोण अर्ज करू शकतो आणि पात्रतेच्या अटी नेमक्या काय आहेत? तर जाणून घ्या त्याचे सविस्तर उत्तर. (Pune MHADA Lottery)

वय आणि वास्तव्याच्या अटी :

– अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असणे बंधनकारक आहे.

– अर्जदाराने मागील 20 वर्षांतील किमान 15 वर्षे महाराष्ट्रात सलग वास्तव्य केलेले असावे. यासाठी बारकोड असलेले आणि जानेवारी 2018 नंतर जारी झालेले Domicile Certificate सादर करणे आवश्यक आहे.

– केंद्रशासन कर्मचारी (CG Category) साठी अधिवास अट शिथिल ठेवण्यात आली आहे.

Pune MHADA Lottery | घर/मालमत्ता धारकांविषयी अटी :

– अर्जदार, त्यांचा पती/पत्नी किंवा अल्पवयीन मुलांच्या नावे म्हाडा, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा शासन वितरित घर/फ्लॅट/भूखंड नसावा.

– जर कोणाकडे आधीच शासकीय गृहनिर्माण योजनेतील घर असेल किंवा केंद्र/राज्य शासनाच्या अनुदानित आवास योजनेचा लाभ घेतलेला असेल, तर त्यांना दुसऱ्या घराचा हक्क नाही.

– 2019 च्या शासन निर्णयानुसार, शासकीय गृहनिर्माण योजनेतील घरधारकांना पुन्हा घर घेता येणार नाही.

उत्पन्न गटानुसार अटी :

दिनांक 01.04.2024 ते 31.03.2025 या कालावधीतील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न खालीलप्रमाणे गटानुसार असणे आवश्यक आहे :

– आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS): ₹6 लाखांपर्यंत

– कमी उत्पन्न गट (LIG): ₹6 लाखांपेक्षा जास्त ते ₹9 लाखांपर्यंत

– मध्यम उत्पन्न गट (MIG): ₹9 लाखांपेक्षा जास्त ते ₹12 लाखांपर्यंत (Pune MHADA Lottery)

– उच्च उत्पन्न गट (HIG): ₹12 लाखांपेक्षा जास्त

उत्पन्नाचे पुरावे म्हणून आयकर विवरणपत्र किंवा तहसिलदाराचा दाखला ग्राह्य धरला जाईल. अन्य कोणतेही पुरावे (जसे प्रतिज्ञापत्र किंवा पगारपत्र) ग्राह्य धरले जाणार नाहीत.

अपंगत्व असलेल्या अर्जदारांसाठी विशेष तरतूद :

– UDID Card (Unique Disability ID) असलेल्या अर्जदारांचा अर्ज ग्राह्य धरला जाईल.

– गतीमंद, मानसिक विकार किंवा सिरेब्रल पाल्सी असलेल्या व्यक्तींसाठी त्यांचे पालक किंवा जबाबदार नातेवाईक अर्ज करू शकतात.

– अशा अर्जदारांच्या बाबतीत त्यांचे वैयक्तिक उत्पन्न विचारात घेतले जाईल.

महत्त्वाची नोंद :

– अर्जदार व सहअर्जदार (पती/पत्नी) या दोघांचेही उत्पन्न नमूद करणे बंधनकारक आहे.

– जर कुणी उत्पन्नाची माहिती लपवली, तर अर्ज रद्द होईल आणि गुन्हा दाखल होऊ शकतो.

– अर्ज करण्यापूर्वी म्हाडाने उपलब्ध केलेली माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

News Title : Pune MHADA Lottery 2025 Eligibility – Who Can Apply for Flats? Full Criteria Explained

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now