पुणेकरांची प्रतीक्षा संपली! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो कधी सुरु होणार; महत्वाची माहिती समोर

On: March 20, 2026 5:28 PM
Khed Shivapur Metro Plan
---Advertisement---

Pune Metro Line 3 | पुणेकरांसाठी, विशेषतः आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला पुणे मेट्रो लाईन 3 प्रकल्प आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. प्रशासनाच्या नव्या नियोजनानुसार मे 2026 पर्यंत या मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. (Hinjawadi Shivajinagar Metro)

हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गामुळे शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना या मेट्रोचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे पुणेकरांची दीर्घ प्रतीक्षा आता लवकरच संपणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

23 किमी मार्ग, पहिल्या टप्प्यात 12 स्थानके :

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची लांबी सुमारे 23.2 किलोमीटर आहे. पहिल्या टप्प्यात या मार्गावरील 12 स्थानके प्रवाशांसाठी खुली केली जाणार आहेत. नुकतीच अभिजित चौधरी यांनी संपूर्ण मार्गिकेची पाहणी करत कामाचा आढावा घेतला. (Pune Metro Line 3)

यावेळी त्यांनी कंत्राटदार कंपन्यांना कामाचा वेग वाढवण्याचे तसेच सुरक्षा आणि गुणवत्तेवर कोणतीही तडजोड न करण्याचे निर्देश दिले. सुरुवातीला हा प्रकल्प डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणार होता. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आणि आता मे 2026 चे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.

Pune Metro Line 3 | देशातील पहिला PPP पद्धतीवरील मेट्रो प्रकल्प :

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो हा अनेक अर्थांनी खास प्रकल्प आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी म्हणजेच PPP तत्त्वावर उभारला जाणारा हा देशातील पहिलाच मेट्रो प्रकल्प मानला जातो. या प्रकल्पासाठी सुमारे 8,313 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. (Pune Metro Update)

या मार्गावर एकूण 23 स्थानके असणार आहेत. हिंजवडीतील आयटी पार्क परिसरातून सुरू होणारी ही मेट्रो बालेवाडी, बाणेर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर आणि शेवटी शिवाजीनगर व सिव्हिल कोर्टपर्यंत जाणार आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर हिंजवडी ते शिवाजीनगर हा प्रवास अत्यंत कमी वेळात पूर्ण होणार आहे.

News Title: Pune Metro Line 3 Update: Hinjawadi to Shivajinagar Metro Likely to Start by May 2026

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now