हिंजवडी ते शिवाजीनगर प्रवास अवघ्या 45 मिनिटांत होणार; वाचा सविस्तर अपडेट

On: August 18, 2026 11:27 AM
pune Metro
---Advertisement---

Pune Metro Line 3 | पुण्यातील वाहतूक कोंडीने हैराण झालेल्या नागरिकांसाठी मोठी दिलासादायक अपडेट समोर आली आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो-3 (Pune Metro Line 3) प्रकल्पाचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण झाला असून सध्या त्याची चाचणी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या सेवेसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली असून, उद्घाटनानंतर पुणेकरांचा प्रवास अधिक वेगवान होण्याची अपेक्षा आहे.

मेट्रोमुळे हिंजवडी-पुणे प्रवासाचा वेळ घटणार :

पहिल्या टप्प्यात माण ते आर. के. लक्ष्मण म्युझियम (R. K. Laxman Museum) असा 13.3 किलोमीटरचा मार्ग असून त्यावर एकूण 12 स्थानके आहेत. हा टप्पा बांधकामाच्या दृष्टीने पूर्ण झाला असून आता अधिकृत उद्घाटनाची प्रतीक्षा आहे. पुढील विस्तारातून हा कॉरिडॉर डिस्ट्रीक्ट कोर्टपर्यंत नेण्यात येणार आहे आणि भविष्यात तो महा मेट्रो (Maha Metro) नेटवर्कशी जोडला जाणार आहे.

या मार्गामुळे हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्क (Rajiv Gandhi Infotech Park) तसेच वाकड, बाणेर, बालेवाडी, युनिव्हर्सिटी सर्कल आणि शिवाजीनगर यांसारखे महत्त्वाचे भाग एकमेकांशी थेट जोडले जाणार आहेत. त्यामुळे या परिसरांमध्ये दररोज प्रवास करणाऱ्या नोकरदारांसह इतर प्रवाशांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. सध्या रस्ते वाहतुकीवर असलेला ताण कमी करण्यासही ही मेट्रो महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

Pune Metro Line 3 | थर्ड रेल तंत्रज्ञानामुळे मेट्रो सेवा अधिक सक्षम :

पुणे मेट्रो लाईन-3 मध्ये DC 750 व्होल्ट थर्ड रेल इलेक्ट्रिफिकेशन सिस्टीमचा वापर करण्यात आला आहे. पुण्यात प्रथमच अशा प्रकारचे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जात असून, देशातील मोजक्या मेट्रो प्रकल्पांमध्ये याचा वापर झालेला आहे. यापूर्वी कोलकाता मेट्रो (Kolkata Metro) आणि बंगळुरू नम्मा मेट्रो (Namma Metro) येथे या प्रणालीचा यशस्वी वापर करण्यात आला आहे.

या पद्धतीमध्ये पारंपरिक मेट्रोप्रमाणे वरच्या बाजूला ओव्हरहेड वायर (Overhead Wire) लावण्याची आवश्यकता नसते. त्याऐवजी रुळांमधूनच मेट्रोला वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे ओव्हरहेड वायर आणि त्यासाठी लागणाऱ्या खांबांवरील खर्च टाळता येतो. त्याचबरोबर देखभाल व दुरुस्तीचा खर्चही कमी होण्यास मदत होते. थेट रुळांमधून वीज मिळत असल्याने वायर तुटण्यामुळे सेवा विस्कळीत होण्याचा धोका देखील कमी होतो.

News title : Pune Metro Line 3 Set for Launch

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now