मोठी बातमी! ‘या’ २ दिवशी बारामतीसह पुणे कडकडीत बंद राहणार

On: January 28, 2026 12:37 PM
Ajit Pawar Dies
---Advertisement---

Ajit Pawar Dies | आज सकाळी महाराष्ट्रात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते अजित पवार हे बारामती विमानतळावर त्यांच्या विमानातील अपघातात मृत्यू पावले आहेत. या अपघातात सहा जणांचा समावेश असून त्यात पवारांसह इतरही कर्मचारी आणि पायलटांचा समावेश आहे. (Ajit Pawar Dies)

अपघात बारामती एअरपोर्टच्या रनवेवर लँडिंग करताना झाला. मिळालेल्या माहितीनुसार विमानाचे लँड करणे विफल झाले आणि विमान रनवेवरून फिचकले, नंतर जमीनावर कोसळले आणि भीषण आग लागल्याने ते पूर्णपणे जळून खाक झाले. त्यावेळी विमानात पवारांसह एकूण सहा प्रवासी व पायलट होते, आणि सर्वांचा मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

आज आणि उद्या पुणे बंदची हाक :

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याची माहिती कळताच लोकांनी बारामतीकडे धाव घेतली आहे आणि मोठी गर्दी रूग्णालयाबाहेर जमा झाली आहे.

दरम्यान आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आकस्मिक निधनानंतर आज आणि उद्या म्हणजेच २८ आणि २९ जानेवारी २०२६ रोजी पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच बारमतीमध्ये देखील आज कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे.

Ajit Pawar Dies | देशभरात शोककळा :

अजित पवार यांच्या अकस्मात निधनाने राज्यात आणि राजकीय क्षेत्रात मोठा धक्का बसला आहे. त्यांना महाराष्ट्रातील प्रभावी नेतृत्वांपैकी एक म्हणून ओळखले जात होते आणि त्यांच्या अचानक निधनामुळे शोकाची लाट पसरली आहे. अनेक राजकीय नेते आणि कार्यकर्ते बारामतीत व मैदानांवर एकत्र जमा झाले आहेत. (Ajit Pawar Dies)

तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन वर्षा निवासस्थानी पोहोचले आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत.

News title : Pune, including Baramati, will remain strictly closed for these 2 days

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now