पुण्यातील ‘या’ ठिकाणची वाहतूक कोंडी सुटणार? ‘डबल डेकर’ उड्डाणपूल होणार!

On: March 18, 2026 6:58 PM
Mumbai Flyover News
---Advertisement---

Pune Double Decker Flyover | पुण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी आणखी एका दुमजली उड्डाणपुलाला मंजुरी देण्यात आली आहे. मुंढवा (Mundhwa), केशवनगर (Keshavnagar) ते खराडी बायपास (Kharadi Bypass) मार्गावरील महात्मा फुले चौक (Mahatma Phule Chowk, Pune) येथे हा डबल डेकर उड्डाणपूल उभारला जाणार आहे. या पुलामुळे परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

126 कोटींच्या प्रकल्पाला स्थायी समितीची मंजुरी :

पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) स्थायी समितीने या दुमजली उड्डाणपुलाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले (Shrinath Bhimale) यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. या प्रकल्पासाठी सुमारे 126 कोटी 63 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

या उड्डाणपुलाची रचना अशी असेल की पहिल्या स्तरावरून वाहनांची वाहतूक सुरू राहील, तर दुसऱ्या स्तरावरून मेट्रो धावणार आहे. त्यामुळे भविष्यातील वाहतुकीचा विचार करून हा प्रकल्प तयार करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सर्व विकासकामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याने पावसाळा वगळता 24 महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Pune Double Decker Flyover | मेट्रो विस्तारालाही मिळाला वेग :

पुणेकरांकडून मेट्रोला मोठा प्रतिसाद मिळत असल्याने मेट्रोच्या विस्तारित मार्गिकांनाही मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार मुंढवा (Mundhwa), केशवनगर (Keshavnagar) ते खराडी (Kharadi) या मार्गावरही मेट्रोचा विचार करण्यात आला आहे. महामेट्रो (MahaMetro) यांच्याशी चर्चा करून या उड्डाणपुलात मेट्रो मार्गाचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती प्रकल्प विभागप्रमुख दिनकर गोजारे (Dinkar Gojare) यांनी दिली.

नळस्टॉप (Nal Stop, Pune) येथील उड्डाणपुलाच्या धर्तीवर हा एकात्मिक डबल डेकर उड्डाणपूल उभारला जाणार आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक आणि मेट्रो दोन्हींचा समन्वय साधून शहरातील वाहतूक अधिक सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

काळेबोराटेनगर येथे भुयारी पादचारी मार्ग :

दरम्यान, हडपसर (Hadapsar) – काळेबोराटेनगर (Kaleboratenagar) मार्गावरील पुणे-मिरज रेल्वे मार्गावर (Pune-Miraj Railway Line) पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग उभारण्यासही स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 5 कोटी 37 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

या भागात रेल्वे गेट वारंवार बंद ठेवावे लागल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत होती. त्यामुळे नागरिकांकडून सुरक्षित पर्यायाची मागणी होत होती. त्यानुसार रेल्वे विभागामार्फत येथे पादचारी भुयारी मार्ग उभारला जाणार असून त्यासाठी आवश्यक निधी टप्प्याटप्प्याने दिला जाणार आहे.

News Title: Pune Gets Another Double Decker Flyover at Mahatma Phule Chowk to Ease Traffic

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now