धक्कादायक! पुण्यात बड्या नेत्याच्या नावे बोगस मतदान तर जिवंत मतदाराला दाखवलं मृत

On: May 13, 2024 3:13 PM
Pune Election Allegation of bogus voting  
---Advertisement---

Pune Election | आज 13 मे रोजी राज्यात लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. यामध्ये पुण्याचा देखील समावेश आहे. मात्र, पुण्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बड्या नेत्याच्या नावाने बोगस मतदान करण्यात आल्याने संताप व्यक्त केला जातोय.

काँग्रसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तर काही ठिकाणी जीवंत मतदारांना मृत दाखवण्यात आल्याने काही नागरिकांना मतदान करता आले नाही.

पुण्यात कॉँग्रेस नेत्याच्या नावे बोगस मतदान

झालं असं की, अरविंद शिंदे हे मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले. मात्र, त्यांनी मतदान न करताच त्यांच्या नावाने दुसऱ्याने मतदान केल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे त्यांनी संताप व्यक्त करत थेट याची चौकशी करण्याची मागणी केली.

पुण्यातील बड्या नेत्यासोबत हा प्रकार घडल्याने इथे अनेकांनी (Pune Election) बोगस मतदान केले असल्याची शंका आता व्यक्त केली जातेय. तसेच निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही आता प्रश्न निर्माण केला जात आहे.

शिरूरमध्येही बोगस मतदान

शिरूर लोकसभा मतदार संघात देखील असंच काही घडलं आहे. येथेही बोगस मतदान झाल्याची माहिती मिळत आहे.राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरु विद्यालयामधील मतदान केंद्रात हा प्रकार घडला आहे. प्रत्यक्षात मतदान करण्यासाठी गेलेल्या मतदाराने बोगस मतदान झाल्याचे उघड केले आहे. यामुळे सध्या याचीच चर्चा रंगली आहे.

तर, पुण्यात मतदान केंद्र क्र.188,महात्मा फुले पेठ ,शाळा नंबर 95,खोली नंबर 2 येथे मतदान असलेल्या 5 जणांच्या बाबतीत मयत नोंदी असल्याचं निदर्शनास आलं. या (Pune Election) मतदारांच्या नावापुढे मयत अशी नोंद दिसल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

News Title – Pune Election Allegation of bogus voting  

महत्त्वाच्या बातम्या-

“मिस्टर राज, तुमच्यात अन् माझ्यात एक फरक…”, राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचा करारा जवाब

लग्नानंतरही ‘या’ अभिनेत्यासोबत होतं श्वेता बच्चनचं अफेअर?, मोठी माहिती समोर

अवकाळी पावसासह महाराष्ट्रावर दुहेरी संकट; ‘या’ जिल्ह्यांना हायअलर्ट

नगरमध्ये विखेंनी अधिकारीच धरले हाताशी? निलेश लंकेनी केला व्हिडीओ शेअर

“धर्मावरून पाकिस्तानला इस्लामिक राष्ट्र बनवलं मग भारताला हिंदू..”; कंगनाचं मोठं वक्तव्य

Join WhatsApp Group

Join Now