पुणे पुन्हा हादरलं! ‘त्या’ भरधाव कारने डिलिव्हरी बॉयला चिरडलं अन् पुढं घडलं अत्यंत भयंकर

On: December 19, 2025 2:38 PM
Pune Drunk And Drive
---Advertisement---

Pune Drunk And Drive | पुण्यात बेदरकार वाहनचालकांमुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. विशेषतः मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्यांमुळे निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात येत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना पुण्यातील चांदणी चौक परिसरात घडली असून, दारूच्या नशेत असलेल्या कारचालकाने एका डिलिव्हरी बॉयला चिरडल्याचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Pune Drunk And Drive)

या भीषण अपघातात २६ वर्षीय डिलिव्हरी बॉय गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. उच्चभ्रू वस्ती आणि वर्दळीच्या रस्त्यावर अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने पुणेकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

भरधाव कारची जबर धडक, छातीवरून गेले चाक :

मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद दिलीप मिसाळ हा तरुण डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत आहे. तो चांदणी चौक परिसरात एक ऑर्डर आल्यानंतर रस्त्याच्या कडेला दुचाकी लावून उभा होता. याच दरम्यान पाठीमागून आलेल्या एका भरधाव कारने त्याला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, प्रसाद खाली पडताच कारचे चाक थेट त्याच्या छातीवरून गेले. (Delivery Boy Accident)

या अपघातात प्रसादच्या बरगड्यांना गंभीर फ्रॅक्चर झाले असून तो रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर कोसळला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ मदत करत त्याला रुग्णालयात दाखल केले. अपघाताचा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, अनेकांनी या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Chandni Chowk Pune)

Pune Drunk And Drive | मद्यधुंद चालक ताब्यात, डिलिव्हरी बॉयची प्रकृती गंभीर :

या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या कारचालकाचे नाव तेजस बाबुलाल चौधरी असे असून, पोलिसांनी त्याला घटनास्थळीच ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीत चालकाने मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले आहे. यानंतर पोलिसांनी त्याच्यावर ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’सह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. (Pune Drunk And Drive)

सध्या जखमी प्रसाद मिसाळ याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून डॉक्टरांनी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, पुण्यातील वाढत्या ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून, दोषींवर कठोर शिक्षा होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

News Title : Pune Drunk And Drive Horror: Delivery Boy Crushed by Speeding Car at Chandni Chowk

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now