पुणेकरांना खास गिफ्ट मिळणार! शहरातील ‘या’ महत्त्वाच्या मार्गांवर धावणार ई-डबल डेकर बस

On: December 19, 2025 12:40 PM
Pune News (13)
---Advertisement---

Pune News | पुणे शहरातील नागरिकांसाठी नव्या वर्षात दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. 2026 च्या सुरुवातीलाच पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतुकीत मोठा बदल पाहायला मिळणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) शहरातील प्रवाशांसाठी अत्याधुनिक आणि पर्यावरणपूरक ई-डबल डेकर बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. (Pune Transport News)

सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, आधुनिक आणि प्रदूषणमुक्त करण्याच्या दिशेने पीएमपीने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीएमपीकडून एकूण 25 इलेक्ट्रिक डबल डेकर बस खरेदी करण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला असून, यासाठी निविदा प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे.

चाचणी यशस्वी; समितीच्या अहवालानंतर निर्णय :

या डबल डेकर इलेक्ट्रिक बससाठी गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू होती. पीएमपीच्या संचालक मंडळाने यापूर्वीच या बस खरेदीस मान्यता दिली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात हिंजवडी, भोसरी, कोरेगाव पार्क आणि विमाननगर या प्रमुख भागांतील रस्त्यांवर दहा दिवसांची प्रात्यक्षिक चाचणी घेण्यात आली होती.

या चाचणीदरम्यान बसची कामगिरी, प्रवासी क्षमता, वळणक्षमता तसेच इलेक्ट्रिक बॅटरीची कार्यक्षमता तपासण्यात आली. बॅटरी तंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास करण्यासाठी तीन सदस्यांची विशेष समिती नेमण्यात आली होती. समितीचा अहवाल सकारात्मक आल्यानंतर अखेर 25 ई-डबल डेकर बस खरेदी करण्याचा निर्णय पीएमपीने घेतला आहे.

Pune News | ‘या’ व्यस्त मार्गांवर सुरू होणार सेवा :

प्राथमिक टप्प्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील (PMPML Bus Update काही अत्यंत गर्दीच्या मार्गांवर या ई-डबल डेकर बस (Electric Double Decker Bus) सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये हिंजवडी फेज 3 वर्तुळ मार्ग, रामवाडी मेट्रो स्टेशन ते खराडी, मगरपट्टा सिटी ते कल्याणीनगर मेट्रो स्टेशन, पुणे स्टेशन ते लोहगाव विमानतळ, देहू ते आळंदी आणि चिंचवड ते हिंजवडी या मार्गांचा समावेश आहे.

प्रवाशांच्या प्रतिसादानुसार भविष्यात या मार्गांमध्ये बदल किंवा वाढ केली जाणार आहे. प्रत्येक डबल डेकर बसमध्ये 60 प्रवासी बसून आणि 25 प्रवासी उभे राहून प्रवास करू शकतील. म्हणजेच एका बसची एकूण प्रवासी क्षमता 85 इतकी असणार आहे. या बसेस पूर्णतः वातानुकूलित, प्रदूषणमुक्त असून शहरातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत.

News Title: Pune to Get E-Double Decker Buses from Early 2026 on Major City Routes

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now