नवरा-बायकोच्या किरकोळ भांडणातून मोठा वाद; धारदार शस्त्राने हल्ला, तिघे गंभीर जखमी

On: March 27, 2026 1:07 PM
Crime News
---Advertisement---

Pune Crime News | नवरा-बायकोच्या किरकोळ भांडणाच्या अनेक घटना समोर येत असतात. मात्र पुण्यातून नुकत्याच समोर आलेल्या एका घटनेनं सर्वांना हादरवलं आहे. पुणे,मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवरा-बायकोच्या किरकोळ भांडणातून मोठा वाद निर्माण होऊन त्याचे हिंसक रूपांतर झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात शिवीगाळ करत धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याने तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

याप्रकरणी तक्रारदार रोहितसिंग सुरजीतसिंग भोंड यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी संबंधितांवर बी.एन.एस.एस. अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. या गुन्ह्यात सागरसिंग जुनी, पिल्लूसिंग जुनी, कृष्णासिंग जुनी, अवतारसिंग जुनी, कन्हैयासिंग जुनी, ओमकारसिंग जुनी आणि शंकरसिंग जुनी यांचा समावेश एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरा-बायकोमधील किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. त्यानंतर आरोपींनी एकत्र येत तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला चढवला. या घटनेत तक्रारदार रोहितसिंग भोंड, त्यांचे वडील सुरजीतसिंग भोंड तसेच भाऊ रोनकसिंग भोंड हे गंभीर जखमी झाले.4

जखमींवर सध्या पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp Group

Join Now