पुण्यातील नवले पुलाखाली भीषण अपघात, पुढे काय घडलं?

On: October 29, 2025 12:26 PM
Accident News
---Advertisement---

Pune Accident | पुणे शहरातील नवले पूल परिसरात (Navale Bridge, Pune) पुन्हा एकदा भीषण अपघात घडला आहे. मंगळवारी पहाटे फरश्या घेऊन जाणाऱ्या एका ट्रकचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने एकामागोमाग तीन वाहनांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन वाहनचालक किरकोळ जखमी झाले असून तीनही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हा अपघात मंगळवारी पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास झाला. मिळालेल्या माहितीनुसार, कात्रज चौकाकडून नवले पुलाच्या दिशेने जाणारा ट्रक अचानक नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात पुढे गेला आणि रेडिमिक्स डंपर तसेच दोन कारला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की कार काही फूट पुढे फेकल्या गेल्या आणि रस्त्याच्या मधोमध अडकल्या.

पोलिसांची तत्काळ धाव, चालक ताब्यात :

अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना कळवले. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करण्यात आली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलिसांनी ट्रकचालक तौफिक इसरार अहमद (वय 32, उत्तर प्रदेश) याला घटनास्थळावरून ताब्यात घेतले आहे.

नवले पूल परिसरात यापूर्वीही अशा प्रकारचे अपघात अनेकदा घडले आहेत. वाढती वाहतूक, ट्रकचा वेग, आणि रस्त्यांची अरुंद रचना यामुळे हा परिसर ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून ओळखला जातो. नागरिकांनी येथे वाहतुकीवरील नियंत्रण वाढवण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे.

Pune Accident | दुसरी घटना — अतिक्रमण कारवाईदरम्यान मारहाणीचा आरोप :

दरम्यान, पुण्यातील आणखी एका घटनेने खळबळ उडवली आहे. मुंढवा परिसरातील बीटी कवडे रोडवर अतिक्रमणाविरोधात कारवाईदरम्यान महापालिकेच्या पथकाकडून स्थानिक व्यापाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप झाला आहे. 26 सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्यापाऱ्याच्या मते, कारवाईदरम्यान पथकातील अधिकाऱ्यांनी कोणतीही नोटीस न देता दुकानासमोरील मांडणी काढण्यास सांगितले. विरोध करताच पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर हात उगारल्याचा आरोप करण्यात आला आहे. व्यापाऱ्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

News Title: Pune Accident: Speeding Truck Rams Vehicles Under Navale Bridge, Video Goes Viral — Police Detain Driver

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now