‘ही’ आहे भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री; फी ऐकून व्हाल थक्क

On: January 31, 2025 5:15 PM
Priyanka Chopra Mahesh Babu SS Rajamouli SSMB29 Movie
---Advertisement---

Priyanka Chopra | बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवत आहे. गेल्या काही वर्षांपासून हिंदी चित्रपटांपासून दूर असलेली प्रियांका, २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्काय इज पिंक’ चित्रपटात शेवटची दिसली होती. त्यानंतर तिने एकाही बॉलिवूड चित्रपटात काम केलेले नाही. त्यामुळे तिचे चाहते तिला पुन्हा एकदा हिंदी चित्रपटात पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच प्रियांकाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रियांका लवकरच प्रख्यात दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्या एका भव्य पॅन इंडिया चित्रपटात झळकणार आहे.

प्रियांकाने ‘आरआरआर’ सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्यासोबत चित्रपट साईन केल्याची माहिती समोर आली आहे. या आगामी चित्रपटात प्रियांका मुख्य भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू आणि प्रियांकाची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ही बातमी समोर येताच चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रियांका इतक्या वर्षांनंतर हिंदी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत आहे. त्याचबरोबर महेश बाबू आणि प्रियांकाची पडद्यावरील केमिस्ट्री पाहण्यासाठी सर्वजण आतुर झाले आहेत.

प्रियांकाची विक्रमी फी, ठरली भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री!

प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) तब्बल ६ वर्षांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिने एस.एस. राजामौली यांच्या चित्रपटाची ऑफर स्वीकारली आहे. या चित्रपटासाठी तिने घसघशीत मानधन आकारले आहे, ज्यामुळे ती भारतातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे.

प्रियांकाने ‘एसएसएमबी२९’ (SSMB29) या चित्रपटासाठी तब्बल ३० कोटी रुपये इतकी मोठी फी आकारली आहे. यासह, प्रियांका भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी विराजमान झाली आहे.

‘एसएसएमबी२९’ चित्रपटाची तगडी स्टारकास्ट

एस.एस. राजामौली यांच्या ‘एसएसएमबी२९’ या अ‍ॅक्शन-अ‍ॅडव्हेंचर चित्रपटात प्रियांकासोबत दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू आणि बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम देखील दिसणार असल्याची माहिती आहे.

राजामौली यांच्या चित्रपटात आधी पृथ्वीराज सुकुमारन झळकणार होता, परंतु आता त्याच्या जागी जॉन अब्राहमची वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाच्या निमित्ताने जॉन आणि प्रियांका (Priyanka Chopra) तब्बल १७ वर्षांनी एकत्र पडद्यावर झळकणार आहेत. यापूर्वी दोघेही २००८ मध्ये आलेल्या ‘दोस्ताना’ चित्रपटात एकत्र दिसले होते.

Title : Priyanka Chopra Mahesh Babu SS Rajamouli SSMB29 Movie

 

Join WhatsApp Group

Join Now