अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या नवऱ्याला झालाय ‘हा’ गंभीर आजार; प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर

On: May 4, 2024 3:59 PM
Priyanka Chopra Husband Nick Jonas Suffers Nasty Influenza
---Advertisement---

Priyanka Chopra | बॉलीवुडनंतर हॉलीवुड गाजवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या नवऱ्याबाबत मोठी माहीती समोर आली आहे. प्रियांका चोप्रा हिचा पती निक जोनस याच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक बातमी समोर आली आहे. यामुळे चाहत्यांचीही चिंता वाढली आहे.

प्रियंकाचा पती निक जोनस (Nick Jonas)याने स्वतःचे अनेक कॉन्सर्ट रद्द केले आहे. शिवाय सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांची माफी देखील मागितली आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र फक्त प्रियांका हिचा पती आणि गायक निक याच्या प्रकृतीची चर्चा रंगली आहे.

निक जोनासने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत जोनास ब्रदर्सचा कॉन्सर्ट पुढे ढकलण्याचे कारण सांगितले आहे. त्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. यात निकने प्रकृतीबद्दल मोठा खुलासा केलाय.

निक जोनासचा व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओमध्ये निक म्हणाला, ‘माझ्याकडे शेअर करण्यासाठी एक बातमी आहे. ती बातमी शेअर केल्यानंतर तुम्हाला आनंद होणार नाही पण सांगणं अत्यंत गरजेचं आहे. गेल्या काही दिवसांपासून माझी प्रकृती ठिक नाही. माझा आवाज देखील खराब झाला आहे. मी कॉन्सर्टसाठी तयारी करत होतो. पण जवळपास दोन महिन्यांपासून माझी प्रकृती ठिक नाही…’, असं निक जोनास म्हणाला.

तसंच पुढे तो म्हणाला की, ‘मी काल दिवसभर अंथरुणावर पडून होतो. ताप, अंगदुखी, घसा खवखवणे आणि खूप वाईट खोकला आहे.डॉक्टरांना दाखवूनही प्रकृतीत सुधार नाही.’, निकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jonas Brothers (@jonasbrothers)

निकने मागितली चाहत्यांची माफी

त्याने कॅप्शनमध्ये झालेल्या आजाराचा खुलासा केलाय. ‘हाय मित्रांनो… मला इन्फ्लूएंजा-ए नावाचा एक भयानक स्ट्रोक झाला आहे. जो सध्या चारही बाजूला फिरत आहे. मी कॉन्सर्टमध्ये गायन करु शकत नाही. म्हणूनच मी मेक्सिको कॉन्सर्टची तारीख पुढे ढकलली आहे. आता हा शो ऑगस्टमध्ये होणार आहे.’ असं प्रियंकाचा (Priyanka Chopra) नवरा निक याने सांगितलं.

News Title –  Priyanka Chopra Husband Nick Jonas Suffers Nasty Influenza

महत्त्वाच्या बातम्या-

हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये ‘या’ कलाकारांनी गमावलाय जीव; अपघात इतका भीषण की शरीराचा एक अवयवही..

..अन् थोडक्यात अनर्थ टळला! भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग

“लग्नानंतरचे अनैसर्गिक संबंध गुन्हा नाही”; हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय

“मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलंय?”; मोदींच्या टीकेवर शरद पवार यांचं जशास तसं प्रत्युत्तर

‘या’ भागांमध्ये येणार उष्णतेची लाट; हवामान खात्याचा इशारा

Join WhatsApp Group

Join Now