Priyanka Chaturvedi | गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट आणि ठाकरे गटात मोठे आरोप-प्रत्यारोप, टीका टिप्पणी होताना पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाच्या खासदार विरूद्ध शिंदे यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. अनेकांचं लक्ष हे या लोकसभा निवडणुकीकडे लागलं. दीना पाटील यांना मुंबईतून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याच प्रचारसभेला प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. कोण एकनाथ शिंदे?, असा सवाल त्यांनी भरसभेत केला. तेव्हा सभेतील उपस्थितांनी गद्दार गद्दार, असं उत्तर दिलं. हा आवाज ठाण्यापर्यंत गेला पाहिजे, अशी टीका त्यांनी केली. त्यानंतर त्यांनी काल शिंदे यांच्या टीकेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल करून त्यांचा चांगलाच समाचार घेतला.
प्रियंका चतुर्वेदी आणि शीतल म्हात्रे आमनेसामने
दरम्यान, चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी केलेल्या टीकेला शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनी पलटवार केला आहे. त्या म्हणाल्या, प्रियंका चतुर्वेदींनी (Priyanka Chaturvedi) खासदारकी कशी मिळवली हे लोकांना माहिती हवं. तुम्ही दावोसला जाऊन गुलाबी थंडीत काय केलं, हे प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी लोकांना सांगितलं पाहिजे.
यानंतर शिंदे गटाचे नेते संजय निरूपम यांनी देखील गद्दार प्रकरणात उडी घेत प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर हल्लाबोल केला. श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर माझे वडील गद्दार असं लिहिलं असेल तर मग आदित्य ठाकरे यांच्या कपाळावर माझा बाप महागद्दार लिहिलं असल्याचं संजय निरूपम म्हणाले.
त्यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेवर हल्लाबोल केला. गद्दारांना गद्दार म्हणायचं नाहीतर मग काय महात्मा म्हणायचं का? गद्दारांना गद्दार म्हणायचं, असं प्रियंका चतुर्वेदी सभेला संबोधित करत असताना म्हणाल्या आहेत. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली आहे.
प्रियंका चतुर्वेदींनी केली मोदींची नक्कल
‘मित्रो क्या ये सही हैं’ असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केली आहे. गद्दारांना गद्दार म्हणायचं नाहीतर मग आणखी काय म्हणायचं? हे तुम्हाला मंजूर आहे का? असं त्या उपस्थितांना विचारत होत्या तेव्हा समोरील गर्दीने नाही असं उत्तर दिलं. महाराष्ट्राच्या जनतेला हे मंजूर नाही, असं त्या म्हणाल्या.
News Title – Priyanka Chaturvedi Slam To Eknath Shinde After Narendra Modi Mimicry
महत्त्वाच्या बातम्या
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करू शकत नसाल तर या गोष्टी खरेदी करा; पैशांची कमी भासणार नाही
विखे- लंकेंसाठी हे 7 राजकारणी नगरमध्ये धुरळा करणार; विखेंसाठी 4 तर लंकेसाठी 3 सभा होणार
महाराष्ट्राच्या ‘महानंद’वर गुजरातच्या मदर डेअरीचा ताबा! यामागचं नेमकं कारण काय
या राशीच्या व्यक्तींनी प्रवास टाळावा
रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघ सोडणार?; माजी क्रिकेटपटूचं भाकीत






