अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात मोठी अपडेट; गुप्तहेरांची एन्ट्री?

On: February 16, 2026 1:29 PM
Ajit Pawar
---Advertisement---

Ajit Pawar | अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान दुर्घटनेनंतर महाराष्ट्रात शोककळा पसरली असतानाच या घटनेभोवती संशयाची छाया गडद होत चालली आहे. बारामतीजवळ झालेल्या स्फोटक अपघातात त्यांचा मृत्यू झाला, मात्र हा केवळ अपघात होता की यामागे काही कटकारस्थान दडले आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. आता या प्रकरणात खासगी गुप्तहेर संस्थेची एंट्री होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रोहित पवारांचा संशय आणि खासगी तपास :

28 जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीकडे येत असताना अजित पवार यांचे विमान बारामती विमानतळाजवळ कोसळले. दुर्घटनेनंतर मोठा स्फोट होऊन आग लागली आणि त्यात त्यांच्यासह विमानातील आणखी चार जणांचा मृत्यू झाला. या घटनेने बारामतीसह संपूर्ण राज्य शोकमग्न झाले. काही दिवसांनंतर मात्र या अपघाताच्या कारणांबाबत विविध प्रश्न उपस्थित होऊ लागले.

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मुंबई आणि दिल्ली येथे पत्रकार परिषद घेत या घटनेविषयी शंका व्यक्त केली. हा अपघात नसून घातपात असू शकतो, असे त्यांनी म्हटले. सरकारी तपास यंत्रणांवर विश्वास नसल्याचे सूचित करत त्यांनी खासगी गुप्तहेर संस्थेकडून स्वतंत्र चौकशी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली दौऱ्यात त्यांनी दोन खाजगी तपास संस्थांच्या प्रतिनिधींशी भेट घेतली असून त्यापैकी एका संस्थेला तपास सोपवण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar | घटनाक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित :

रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत अनेक मुद्दे मांडले. मुख्य वैमानिक कपूर यांची सखोल चौकशी व्हावी, ते मद्यप्राशन करत होते का, मानसिक तणावाखाली होते का किंवा आर्थिक दबाव होता का, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. संबंधित कंपनीच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधील संदेशांची तपासणी करावी, चॅट्स डिलीट झाल्या असल्या तरी त्या पुनर्प्राप्त करता येतात, असेही त्यांनी नमूद केले. ‘अॅरो’ नावाच्या कंपनीच्या संवादांचीही चौकशी व्हावी, अशी त्यांची भूमिका होती.

तसेच कमी दृश्यमानता असताना टेकऑफ आणि लँडिंग का करण्यात आले, हँडलरने परवानगी कशी दिली, यासारखे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. या प्रकरणात VSR कंपनी (VSR Company) विरोधात कारवाई का झाली नाही, असा सवालही त्यांनी केला. दुर्घटनेला आज 20 दिवस पूर्ण झाले तरी DGCA (Directorate General of Civil Aviation) कडून प्राथमिक अहवाल जाहीर झालेला नाही, असे सांगत त्यांनी सोशल मीडियावर ट्विट करत तातडीने अहवाल प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे. सरकारी यंत्रणांच्या भूमिकेबाबत शंका वाढत असल्याने आता या तपासाला वेगळे वळण मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

News title : Private Probe in Pawar Crash Case

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now