Prithviraj Chavan | लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्याचं मतदान पार पडलं आहे. आता येत्या 20 तारखेला शेवटचा आणि अखेरचा टप्पा पार पडणार आहे. शेवटच्या टप्प्यातील प्रचाराला आता रंगत आली आहे. नेतेमंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. तर,काही राजकीय नेत्यांनी किती जागा जिंकून येणार, याबाबत दावे देखील केले आहेत.
अशात भाजपला देशभरात किती जागा मिळणार, याबाबत काँग्रेसच्या बड्या नेत्याने दावा केला आहे. भाजपने देशात 400 पारचा नारा दिलाय. मात्र, 400 तर दूरच राहिलं भाजपाला 250 च जागा मिळतील, असा दावा कॉँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा दावा
निवडणुकीत हार-जीत होत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पराभव स्वीकारला पाहिजे, असेही पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी म्हटले. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी भाजपावर निशाणा साधला.
या लोकसभा निवडणुकीत भाजप 220 ते 250 जागा जिंकेल, एनडीएला 272 हा बहुमताचा आकडाही पार करता येणार नाही. 2019 मध्ये बहुतांश राज्यांमध्ये भाजपचा परफॉर्मन्स इतका चांगला होता की, आता त्यांना वर जायला जागाच शिल्लक नाही. असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
“एनडीए 272 ही मॅजिक फिगर गाठू शकणार नाही”
पुढे बोलताना ते म्हणाले की, “माझ्या मते देशातील पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या सहा जागा महत्वाच्या आहेत. या सहा राज्यात भाजपच्या जागा कमी होतील. त्यामुळे एनडीए 272 ही मॅजिक फिगर गाठू शकणार नाही.”, असं पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. नरेंद्र मोदींना महाराष्ट्राचा इतिहास माहिती नसेल. इथली जनता ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्वांवर चालते. शिवाजी महाराज हे सर्वधर्मसमभावाचे सर्वात मोठं प्रतीक आहेत.असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
News Title – Prithviraj Chavan claim regarding Lok Sabha result
महत्त्वाच्या बातम्या-
अजित पवारांचं टेन्शन वाढलं, बारामतीत पुन्हा एकदा पवार विरूद्ध पवार होणार लढत?
मोठी बातमी! ‘या’ तारखेला लागणार बारावीच्या निकाल?; बोर्डाकडून महत्वाची अपडेट
“माझ्याकडून काही चुका…”; मुलगा सैफबद्दल असं का म्हणाल्या शर्मिला टागोर?
राखीची तब्येत नाजूक, ‘या’ आजाराशी करतेय सामना?; एक्स नवऱ्याकडून खुलासा
“ईडीने जप्त केलेले पैसे मी गोरगरिबांना देणार”, नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य






