फडणवीसांनी दिलेला शब्द पूर्ण केला, शिंदेंच्या खास नेत्यावर दिली सर्वात मोठी जबाबदारी

On: April 10, 2025 1:50 PM
Maharashtra Gunthewari Law
---Advertisement---

Maharashtra l राज्यात सत्तास्थापनेनंतर महायुतीमध्ये खातेवाटप व महामंडळांवरील नियुक्त्यांवरून सुरू असलेला तिढा आता काही अंशी सुटताना दिसतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेला शब्द अखेर पूर्ण केला असून, प्रताप सरनाईक यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे.

महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर काही महामंडळांवर सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात नाराजीचे वातावरण होते. याच पार्श्वभूमीवर परिवहन खात्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांची अध्यक्षपदावर नियुक्ती रखडल्याची चर्चा होती. मात्र, अखेर आज शासन निर्णयान्वये सरनाईक यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.

एकनाथ शिंदेंच्या गटाला मोठा दिलासा :

प्रताप सरनाईक हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय नेते मानले जातात. त्यामुळे या नियुक्तीला राजकीय दृष्टिकोनातून महत्त्व आहे. फडणवीसांनी दिलेला शब्द पूर्ण करून महायुतीतील समन्वय राखण्याचा प्रयत्न केल्याचं चित्र उभं राहिलं आहे. यामुळे शिंदे गटात समाधानाचं वातावरण असल्याची माहिती आहे.

एसटी महामंडळाची स्थापना 1960 साली झाली असून, र. गो. सरैय्या हे पहिले अध्यक्ष होते. प्रताप सरनाईक हे या पदावर विराजमान होणारे २६वे अध्यक्ष ठरणार आहेत. यापूर्वी अनेक नामवंत नेत्यांनी या पदाची जबाबदारी सांभाळली आहे.

Maharashtra l एसटीला आर्थिक बळकटी देण्याचा निर्धार :

नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना प्रताप सरनाईक म्हणाले, “एसटी ही महाराष्ट्राच्या जनतेची लोकवाहिनी आहे. तिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करत दर्जेदार सेवा देण्यासाठी मी कटिबद्ध आहे.” सध्या एसटी महामंडळ आर्थिक संकटातून जात असून, कर्मचाऱ्यांच्या पगारातही अडचणी आहेत. अशा परिस्थितीत सरनाईक यांच्यावर मोठी जबाबदारी येणार आहे.

महायुतीतील आलबेल असल्याचे जरी सांगितले जात असले, तरी खातेवाटपातील बऱ्याच नियुक्त्या अद्यापही प्रलंबित आहेत. प्रताप सरनाईक यांची नियुक्ती ही त्या प्रक्रियेतील एक महत्त्वाची पावलं मानली जात आहे.

News Title: CM Fadnavis Fulfills Promise: Pratap Sarnaik Appointed as ST Corporation Chairmas

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now