प्रज्वल रेवन्नानंतर भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यावर लैंगिक शोषणाचे आरोप, राजकारणात खळबळ

On: May 11, 2024 2:41 PM
BJP Yuva Morcha
---Advertisement---

Prajwal Revanna | प्रज्वल रेवन्ना (Prajwal Revanna) कथित सेक्स प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडल्या. सध्या प्रज्वल रेवन्ना (Prajwal Revanna) हे परदेशात फरार असल्याच्या चर्चा आहेत. अशातच आता प्रज्वल रेवन्ना (Prajwal Revanna) सेक्स स्कँडल प्रकरणानंतर आता भाजपमधील नेत्यावर लैंगिक आरोप करण्यात आले आहेत. त्यांचं नाव हे देवराजे गौडा यांच्यावर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात देवराजे यांना उशीरा ताब्यात घेतल्याची माहिती आता समोर आली आहे.

देवराजे गौडा हे बंगळुरूहून चित्रदुर्गाकडे जात होते. यादरम्यान त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. एका 36 वर्षीय महिलेने देवराजे यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. देवराजे यांनी तिची मालमत्ता विकण्यासाठी मदत करण्याचं आमिष दाखवलं. यानंतर तिचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रज्वल रेवन्ना (Prajwal Revanna) यांचे लैंगिक व्हिडीओ लिक करणारे देवराजे असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र त्यांनी हा आरोप काँग्रेसवर केला आहे.

व्हिडीओ लिक करण्यामागचं कारण आलं समोर

प्रज्वल रेवन्ना (Prajwal Revanna) यांचे व्हिडीओ लिक करण्यामागचं कारण आता समोर आले आहेत. प्रज्वल रेवन्ना यांचं देवराजे यांनी व्हिडीओ लिक केले असल्याचा दावा केला जात आहे. गौडा यांनी हसमधील लोकसभा निवडणुकीत रेवन्ना यांच्यातील जीडीएस पक्षाच्या नेत्याला उमेदवारी देण्यासाठी विरोध केला होता. मात्र रेवन्ना यांना उमेदवारी देण्यात आली. त्याप्रकरणातून हे सेक्स स्कँडल बाहेर आल्याचं बोललं जातंय.

26 एप्रिल रोजी हसन लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडली. त्याच्याच दुसऱ्या दिवशी प्रज्वल रेवन्ना यांचे लैंगिक शोषण केल्याचे व्हिडीओ व्हायरल होऊ लागले आहेत. हे व्हिडीओ देवराजे गौडा यांनी व्हायरल केले असल्याचा आता दावा करण्यात आला आहे. व्हिडीओत प्रज्वल रेवन्ना महिलांचे लैंगिक शोषण करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

प्रज्वल जर्मनीला फरार

प्रज्वल रेवन्ना हे माजी पंतप्रधान आणि जीडीएसचे एचडी देवेगौडा यांचे नातू आहेत. व्हिडीओ बाहेर आल्यानंतर प्रज्वल जर्मनीला फरार झाला असल्याची माहिती समोर आली. त्यावेळी त्याला पक्षाने निर्णय घेत निलंबित केलं आहे.

एचडी रेवन्ना सध्या तीन मुलांची आई असलेल्या महिलेचे अपहरण केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. तर प्रज्वलवर बलात्कार, विनयभंग, धमकावणे, ब्लॅकमेलिंग आरोपांसह तीन एफआयआर गुन्हे दाखल आहेत.

News Title – Prajwal revanna Sex Scandal Important Update

महत्त्वाच्या बातम्या

“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला त्रास होत असेल”

नागरिकांनो ‘या’ तीन आरोग्य विमा पॉलिसी झाल्या बंद; पॉलिसीधारकांचे काय होणार?

नवीन आलिशान कार लाँच, किंमत एकूण खरेदी करण्याचा येईल मनात विचार

रोहित पवारांचा बारामतीत पैसे वाट्ल्याचा आरोप खरा ठरणार? बँक व्यवस्थापकाचं निलंबन

अब्दु रोजिकने उरकला साखरपुडा; ‘या’ दिवशी अडकणार लग्नबंधनात

Join WhatsApp Group

Join Now