Praful Lodha Arrest | हनी ट्रॅप आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील प्रफुल्ल लोढाला अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. बावधन पोलीस ठाण्यात ३६ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात प्रफुल्ल लोढाला आज सकाळी ऑर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेण्यात आलं असून काही वेळातच त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. (Praful Lodha Arrest)
मुंबईतील प्रकरणांनंतर पुण्यात नवी तक्रार :
या महिलेने १७ जुलै २०२५ रोजी फिर्याद दाखल केली होती. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, २७ मे २०२५ रोजी बालेवाडीतील नामांकित हॉटेलमध्ये पतीला नोकरी लावण्याचं आमिष दाखवत प्रफुल्ल लोढाने महिलेवर लैंगिक अत्याचार केला. नोकरी मिळवून देतो, अन्यथा नोकरी घालवतो अशी धमकी देत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले, असे महिलेचे म्हणणे आहे.
प्रफुल्ल लोढाविरुद्ध यापूर्वी मुंबईतील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलीस ठाण्यात हनी ट्रॅप आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले होते. त्या गुन्ह्यांनंतर आता पुण्यातील बावधन पोलीस ठाण्यातदेखील बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर बावधन पोलिसांनी कोर्टातून हस्तांतरण वॉरंट मिळवत लोढाला ताब्यात घेतलं. (Praful Lodha Arrest)
Praful Lodha Arrest | प्रफुल्ल लोढाचा राजकीय प्रवास आणि वाद :
प्रफुल्ल लोढा हा एकेकाळी जळगाव जिल्ह्यातील एका मातब्बर नेत्याचा निकटवर्तीय मानला जात होता. मात्र, नंतर त्याने त्याच नेत्यावर गंभीर आरोप करत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्याला वंचितकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. पण अवघ्या पाच दिवसांतच त्याने माघार घेतली.
कथित समाजसेवक आणि आरोग्यदूत म्हणून ओळख मिळवलेल्या प्रफुल्ल लोढाविरुद्ध यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. आता पुण्यातील या प्रकरणामुळे त्याच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे.






