SRH चा स्टार बॉलर प्रफुल्ल हिंगे कोण आहे? त्याच्या कामगिरीने संपूर्ण क्रिकेट विश्व हादरलं!

On: April 14, 2026 1:22 PM
Praful Hinge
---Advertisement---

Praful Hinge | आयपीएलच्या (Indian Premier League) दीर्घ इतिहासात क्वचितच पाहायला मिळणारी कामगिरी एका युवा गोलंदाजाने करून दाखवली आहे. विदर्भातून आलेल्या प्रफुल्ल हिंगेने आपल्या पदार्पण सामन्यातच अप्रतिम गोलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या कामगिरीमुळे क्रिकेटविश्वात मोठी चर्चा रंगली आहे.

पहिल्याच षटकात तीन विकेट्सचा विक्रम :

सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाकडून खेळणाऱ्या प्रफुल्ल हिंगेने राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्धच्या सामन्यात पहिल्याच षटकात तीन फलंदाजांना बाद करत इतिहास रचला. आयपीएलच्या 18 वर्षांच्या कालावधीत डावाच्या सुरुवातीच्या षटकात अशी कामगिरी प्रथमच घडल्याचे मानले जात आहे. त्याने पहिल्याच चेंडूवर वैभव सूर्यवंशीला गोल्डन डकवर बाद केले आणि लगेचच पुढील फलंदाज ध्रुव जुरेललाही क्लीन बोल्ड करत पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

त्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर आंद्रे प्रिटोरियसने फटका मारण्याचा प्रयत्न केला, मात्र तो थेट सीमारेषेजवळ झेलबाद झाला. एका षटकात तीन विकेट्स घेत प्रफुल्लने प्रतिस्पर्धी संघाला मोठा धक्का दिला. या शानदार सुरुवातीनंतरही त्याची गोलंदाजी थांबली नाही आणि पुढील षटकात त्याने राजस्थानचा कर्णधार रियान परागलाही बाद करत आपल्या कामगिरीत भर घातली.

Praful Hinge | विदर्भाचा खेळाडू ठरला हैदराबादचा ‘ट्रम्प कार्ड’ :

नागपूर (Nagpur) येथील रहिवासी असलेला प्रफुल्ल हिंगे हा विदर्भ (Vidarbha) क्रिकेट संघाकडून खेळतो. याच वर्षाच्या सुरुवातीला विदर्भाने विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) जिंकली होती आणि त्या विजयानंतर प्रफुल्लच्या योगदानाची मोठी चर्चा झाली होती. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याला आयपीएलमध्ये संधी मिळाली.

सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाने त्याच्यावर विश्वास ठेवत 30 लाख रुपयांना त्याची निवड केली होती. त्या विश्वासाला प्रफुल्लने आपल्या पहिल्याच सामन्यात न्याय दिला आहे. त्याच्या या जबरदस्त प्रदर्शनामुळे तो संघासाठी महत्त्वाचा खेळाडू ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

News title : Praful Hinge Creates IPL History

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now