Poonam Pandey Pregnancy | वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. तिने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो शेअर केले असून त्यात ती बेबी बंप दाखवताना दिसत आहे. या पोस्टनंतर ती खरोखरच गरोदर आहे का, याबाबत चाहत्यांमध्ये आणि नेटकऱ्यांमध्ये विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
बेबी बंप फोटोमुळे चर्चा रंगल्या :
मंगळवार, 31 मार्च रोजी पूनम पांडे (Poonam Pandey)ने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर दोन फोटो पोस्ट केले. या फोटोंमध्ये ती टी-शर्ट थोडा वर करून तिचा बेबी बंप दाखवताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्येही ती स्वतःच्या मातृत्वाचे संकेत देताना दिसते. मात्र या पोस्टसोबत तिने कोणतेही स्पष्ट स्पष्टीकरण दिलेले नाही. कॅप्शनमध्ये तिने फक्त गर्भवती स्त्री, बाळ आणि दुधाच्या बाटलीचे इमोजी वापरले आहेत. (Poonam Pandey Pregnancy)
या पोस्टनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. काही चाहत्यांनी तिला शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे. मात्र अनेकांनी या पोस्टकडे संशयाने पाहत ती केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेली युक्ती असू शकते असेही म्हटले आहे. काही नेटकऱ्यांनी या पोस्टमध्ये दिसणाऱ्या बाळाच्या वडिलांबद्दलही प्रश्न उपस्थित केले आहेत.
Poonam Pandey Pregnancy | एप्रिल फूलमुळे वाढला संशय :
या पोस्टवर प्रतिक्रिया देताना काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी हे फोटो कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) वापरून तयार केले असावेत अशी शक्यता व्यक्त केली आहे. तसेच काहींनी उद्या 1 एप्रिल असल्याने हा एप्रिल फूलचा स्टंट असू शकतो असेही म्हटले आहे. त्यामुळे पूनम पांडेच्या या पोस्टमागे नेमकं सत्य काय आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
गेल्या वर्षीही पूनम पांडे (Poonam Pandey) मोठ्या वादात सापडली होती. 1 फेब्रुवारी 2024 रोजी तिच्या टीमने तिचा गर्भाशयाच्या कर्करोगामुळे मृत्यू झाल्याची बातमी सोशल मीडियावर जाहीर केली होती. त्या बातमीने देशभरात खळबळ उडाली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी म्हणजे 2 फेब्रुवारीला तिने एका व्हिडिओद्वारे आपण जिवंत असल्याचे सांगत कर्करोगाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे स्पष्ट केले होते. त्या घटनेनंतर ती मोठ्या प्रमाणात ट्रोलही झाली होती. आता तिच्या नव्या पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले असून ती खरोखरच गरोदर आहे की हा आणखी एक पब्लिसिटी स्टंट आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






