राजकीय नेत्याच्या पत्नीचा मोठा खुलासा, म्हणाली “मला गाडीत छळलं, इतर पुरुषांसोबत…”

On: May 21, 2025 3:24 PM
---Advertisement---

Political News | तामिळनाडूतील रानीपेट जिल्ह्यातील अरक्कोनम येथून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. द्रमुक (DMK) पक्षाच्या युवा शाखेच्या उपसचिवाचा दावा करणाऱ्या दैवसेयल या व्यक्तीच्या पत्नीने त्याच्यावर मानसिक, शारीरिक आणि लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले असून, या प्रकरणामुळे राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.

कुटुंबाला जाळून टाकण्याची धमकी-

पीडित पत्नीने स्पष्ट (Political News) सांगितले की, “माझा नवरा २० वर्षांच्या तरुणींना राजकारण्यांसोबत झोपायला लावायचा. त्याने मलाही अनेकदा छळ केलं. माझ्यावर हल्ला केला, माझा फोन फोडला आणि आत्महत्येचा प्रयत्न करायला लावला.” ती म्हणाली, “कॉलेजला जाताना तो मला धमकी देत असे, पोलिस माझ्या बाजूनेच राहतील.”

तिने पुढे सांगितले की, “त्याने मला गाडीत छळलं, इतर पुरुषांसोबत झोपायला सांगितलं. माझ्या कुटुंबाला जाळून टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे मी परीक्षाही देऊ शकले नाही.”

द्रमुक नेत्यावर संरक्षणाचा आरोप-

या प्रकरणावर एआयएडीएमके (AIADMK) ने तीव्र प्रतिक्रिया (Political News) दिली आहे. पक्षप्रमुख एडाप्पाडी के. पलानीस्वामी (Edappadi K. Palaniswami) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राज्यातील पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यांनी म्हटलं की, “FIR फाईल होण्यासाठी आमदार एस. रवी यांनी हस्तक्षेप करावा लागला, यावरून सत्ताधाऱ्यांकडून आरोपीला संरक्षण दिलं जात आहे हे स्पष्ट होतं.” पीडितेने आपल्यासोबत पतीचे राज्य शिक्षण मंत्री अनबिल महेश पोयमोझी यांच्यासोबतही संबंध असल्याचा दावा केल्यामुळे प्रकरण आणखीच संवेदनशील बनले आहे.

तपासानंतर योग्य कारवाई होईल-

द्रमुक पक्षाने या आरोपांवर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “दोषी आढळल्यास पोलिस योग्य ती कारवाई करतील. तसेच पक्षपात न करता अंतर्गत तपास करून निर्णय घेतला जाईल.”

News Title – political news DMK Leader’s Wife Alleges Abuse

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now