पुण्यात राजकीय भूकंप! काँग्रेसचा ‘हा’ महत्त्वाचा युवा नेता राष्ट्रवादीच्या गळाला

On: September 27, 2025 12:17 PM
Pune Politics
---Advertisement---

Pune Politics | आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. यामुळे पुणे जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, युवक नेते आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

काँग्रेसचा पाया अधिकच कमकूवत :

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील (Rohan surawase Patil) यांनी आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. पाच वर्षे काँग्रेसमध्ये काम करूनही अंतर्गत गटबाजीमुळे कामाला संधी मिळत नसल्याने अखेर त्यांनी पक्ष बदलल्याचे सांगितले.

यापूर्वीही काँग्रेसचे तब्बल तीन माजी आमदार भाजपमध्ये (BJP) दाखल झाल्याने जिल्ह्यातील काँग्रेस संघटना कमकुवत झाली होती. आता युवक नेत्यांच्या या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसचा पाया अधिकच कमकूवत झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Pune Politics | “पक्ष संघटन मजबूत करून चांगले काम करा” :

कसबा पेठ या मतदार संघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनीही काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशावेळीही त्यांनी काँग्रेस पक्षातील नेते मंडळींवर गटबाजीचे आरोप केले होते.

अजित पवार यांच्या हस्ते झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात नव्या कार्यकर्त्यांना “पक्ष संघटन मजबूत करून चांगले काम करा” असे आवाहन करण्यात आले.

राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांची नावे:

रोहन सुरवसे पाटील – सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस

सागर नायकुडे

पुष्कर ढमाले

आकाश नवले

देवेंद्र खाटेर

ज्ञानेश्वर जाधव

सोनू आंधळे

सचिन मोरे

सत्यजित गायकवाड

दीपक चौगुले

आदित्य शेटे

निखिल मुळीक

अॅड. सुधीर शिंदे

प्रशांत मोरे

गणेश शिंदे

News title : Political earthquake in Pune! Congress youth leader Rohan Suravase Patil joins NCP

Join WhatsApp Group

Join Now