दुग्ध व्यावसायिक ते राजकारणाचे ‘धुरंधर’! आमदार शिवाजी कर्डिले यांची राजकीय कारकीर्द

On: October 17, 2025 5:21 PM
RIP Shivaji Kardile
---Advertisement---

Shivaji Kardile Death | अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातील आमदार शिवाजी भानुदास कर्डिले (Shivaji Kardile Death) यांचे निधन झाले. वयाच्या ६६ व्या वर्षी कर्डिलेंनी अखेरचा श्वास घेतला. बुऱ्हानगर गावच्या सरपंचपदापासून आमदारकीपर्यंतचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. तर आज आपण जाणून घेऊयात शिवाजी कर्डिले यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल थोडक्यात…

शिवाजी कर्डिले यांची राजकीय कारकीर्द :

आमदार शिवाजी कर्डिले हे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते. त्यांनी सहावेळा आमदारकी भूषवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होते. १९८४-९५ मध्ये ते बुऱ्हानगर सरपंचपदी निवडून आले आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिलेच नाही. १९९० मध्ये त्यांनी नगर येथे बानेश्वर शैक्षणिक संस्था स्थापना केली. १९९५ आणि १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत नगर -नेवासा येथून ते अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. २००३-०४ मध्ये ते मत्स्य व बंदरे विकास विभागाच्या राज्यमंत्री पदी होते. २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते आमदार म्हणून निवडून आले. अहिल्यानगर जिल्हा बँक संचालक, अहिल्यानगर जिल्हा बँक चेअरमन हि पदेही त्यांनी भूषवली. २००९ च्या खासदारकीच्या निवडणुकीत मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर २००९ व २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. २००९ मध्ये ते प्रथम अपक्ष म्हणून निवडून आले. २०१४ च्या निवडणुकीत कर्डिले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरीत जाहीर सभा घेतली होती. २०१९ च्या निवडणुकीत त्यांना हॅटट्रिक करता आली नाही. २०१९ च्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, २०२४ च्या निवडणुकीत कर्डीले (Shivaji Kardile Death) यांनी जोरदार पुनरागमन केलं. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्राजक्त तनपुरे यांचा तब्बल ३४ हजार मतांनी पराभव करत पुन्हा एकदा विधानसभा गाठली होती.

Shivaji Kardile Death | नगर जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण :

सध्या ते विद्यमान आमदार तसेच अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष होते. नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या वार्षिक सभेत त्यांनी पूरग्रस्तांसाठी एक कोटीचा निधी जाहीर केला होता. त्याचप्रमाणे सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी बजावली.  कर्ज देऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्यांनी आर्थिक आधार दिला होता. जिल्ह्याच्या राजकारणात एक धुरंधर नेता म्हणून त्यांची ओळख होती. बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा आणि हॉटेल उद्योग यामुळे त्यांचे नाव संपूर्ण नगर जिल्ह्यात झाले. सुरुवातीला त्यांनी दुधाचा व्यवसाय सुरू केला. ते काही काळ गावचे संरपंच होते. त्यानंतर अपक्ष म्हणून आमदरकी साठी उभे राहिले आणि निवडूनही आले. अनेकदा आमदार, राज्यमंत्री, अहिल्यानगर जिल्हा बँकेचे चेअरमन आदी विविध पदांवर त्यांनी काम केले.

शिवाजीराव कर्डिले नुकतेच मोठ्या आजारातून बरे झाले होते. त्यांना डॉक्टरांनी विश्रांती आणि काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. लोकांमध्ये मिसळण्याची सवय असलेले कर्डिले पुन्हा सक्रीय झाले होते.
त्यांच्या निधनाने नगर जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

News titile : Political career of MLA Shivaji Kardile

Join WhatsApp Group

Join Now