मोठी बातमी : मनोज जरांगे पाटलांना गावकऱ्यांनी दिला सर्वात मोठा धक्का

Maratha Reservation l राज्यभर मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजला आहे. या आरक्षणावरून रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलं होत. अशातच आता पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला अंतरवली पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे.

मनोज जरांगे पाटलांना पोलिसांनी दिला धक्का :

मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसणार होते. मात्र अशातच त्यांना पोलिसांनी धक्का दिला आहे. पोलिसांनी मनोज जरांगे यांची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील काय करणार, याकडे सर्व मराठा समाजाच्या नजरा लागल्या आहेत.

यापूर्वी मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्रस्थान असलेल्या अंतरवली सराटीच्या गावकऱ्यांनी मनोज जरांगे पाटलांना उपोषणाला विरोध केला होता. त्यानंतर आता अंतरवली पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण करू नये म्हणून उपोषणाला विरोध केला आहे. त्यामुळे राज्यात याचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Maratha Reservation l जरांगेंच्या आमरण उपोषणाला ग्रामस्थांनी विरोध का केला? :

मराठा आरक्षण संदर्भात मनोज जरंगे पाटील यांनी चार दिवसांपूर्वी अंतरवलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. मात्र शेजारील गावातील दिलेल्या निवेदनावरून प्रशासनाने जातीय सलोखा बिघडण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. तसेच ग्रामपंचायतच्या कामांना अडथळा आणि महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेता अंतरवली पोलिसांकडून मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला परवानगी नाकारण्यात आल्याचे समजत आहे. याशिवाय आमरण उपोषणाच्या जागेबाबत ग्रामसभेचे कोणतीही कागदपत्रं सादर न केल्यामुळे जरांगे पाटलांची ही परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

अंतरवली सराटी या गावातील उपसरपंचांसह तब्बल 70 जणांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे गावातील जातीय सलोखा बिघडत आहे. त्यामुळे प्रशासनने मनोज जरांगे यांना हे उपोषणास परवानगी देऊ नये अशी मागणी ग्रामस्थांनी या निवेदनातून केली होती.

News Title – Police denied permission to Manoj Jarange Patal hunger strike

महत्त्वाच्या बातम्या

भाजपने असं काय केलं? थेट मनसेने घेतली माघार

राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

अजित पवार गटाचे ‘हे’ 6 आमदार नाराज; घरवापसी करणार? अजित पवार म्हणाले…

या राशीच्या व्यक्तींनी जोडीदाराविषयीचे गैरसमज टाळावेत

“देवेंद्र फडणवीसांमुळेच भाजपचा पराभव झाला”; ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य