PMC Budget 2026 : पुणे महापालिकेचं मेगा बजेट जाहीर! पुणेकरांना काय-काय मिळणार?

On: March 9, 2026 5:42 PM
PMC Budget 2026
---Advertisement---

PMC Budget 2026 | राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याचा विकासरथ अधिक वेगाने धावण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. पुणे महानगरपालिकेचे (PMC) आयुक्त नवल किशोर राम (Naval Kishore Ram) यांनी 2026-27 या आगामी आर्थिक वर्षासाठी तब्बल 13 हजार 995 कोटी रुपयांचे भव्य अंदाजपत्रक नुकतेच स्थायी समितीसमोर सादर केले. यंदाच्या बजेटमध्ये पुणेकरांची तहान भागवण्यासाठी आणि शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीतून त्यांची सुटका करण्यासाठी विशेष आर्थिक उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.

वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ‘मास्टरप्लॅन’
पुण्यातील सर्वात मोठी डोकेदुखी असलेल्या ट्रॅफिक समस्येवर या बजेटमध्ये प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. शहराच्या वाहतूक नियोजनासाठी 740 कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आला आहे. अनधिकृत पार्किंगला आळा घालण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर शहरातील 5 प्रमुख रस्त्यांवर ‘पे अँड पार्क’ योजना राबवली जाणार आहे. तसेच, मेट्रो प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकांजवळील 30 ‘अॅमेनिटी स्पेस’वर स्वतंत्र पार्किंग व्यवस्था उभी केली जाईल.

पायाभूत सुविधांना गती देताना, घोरपडी रेल्वे पूल तसेच आगाखान आणि सनसिटी-कर्वेनगर हे नदीवरील पूल येत्या पावसाळ्यापूर्वी वाहतुकीसाठी खुले करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. याव्यतिरिक्त, शास्त्रीनगर, बिंदू माधव ठाकरे चौक आणि सेनापती बापट चौक येथील उड्डाणपुलांची कामे पुढील दोन वर्षांत मार्गी लावली जातील. विशेष म्हणजे, पाषाण ते कोथरूड आणि हिंगणे ते तळजाई या दोन महत्त्वपूर्ण भूमिगत बोगद्यांच्या उभारणीचाही गांभीर्याने विचार सुरू आहे.

पाणीपुरवठा आणि इतर पायाभूत सुविधांना प्राधान्य
शहराच्या वाढत्या विस्ताराचा विचार करता, पाणीपुरवठा विभागासाठी अर्थसंकल्पात सर्वाधिक 2,077 कोटी रुपयांची घसघशीत तरतूद करण्यात आली आहे. त्याखालोखाल शहरातील रस्त्यांचे जाळे बळकट करण्यासाठी पथ विभागाला 1,866 कोटी रुपये मंजूर केले आहेत. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी घनकचरा व्यवस्थापनाला 1,390 कोटी, तर सांडपाणी आणि मलनिस्सारण प्रकल्पांसाठी 1,216 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

प्राथमिक शिक्षण: 979 कोटी रुपये

भवन रचना (इमारत बांधकाम): 650 कोटी रुपये

विद्युत विभाग: 265 कोटी रुपये

उद्यान आणि सुशोभीकरण: 205 कोटी रुपये

समाज विकास: 143.50 कोटी रुपये

आरोग्य सेवा: 88 कोटी रुपये

नगर रचना नियोजन: 64.50 कोटी रुपये

माहिती व तंत्रज्ञान (IT): 56.73 कोटी रुपये

पर्यावरण संवर्धन: 5159 कोटी रुपये

हेरिटेज सेल (वारसा जतन): 28.50 कोटी रुपये

Join WhatsApp Group

Join Now