मोदी सरकारची सुक्ष्म उद्योगांसाठी महत्त्वाची योजना, ‘इतक्या’ लाखांपर्यंत मिळणार कर्ज

On: February 21, 2025 4:34 PM
PM Modi Government Launches Micro Credit Card for MSME 
---Advertisement---

PM Modi Government | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Government ) सरकारने गेल्या दहा वर्षांत छोट्या व्यवसायांना चालना देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये कौशल्य विकासासाठी सरकारकडून मदत, तसेच मुद्रा लोन आणि अन्य आर्थिक योजनांचा समावेश आहे. आता केंद्र सरकारने सूक्ष्म उद्योगांसाठी मायक्रो क्रेडिट कार्ड योजना आणण्याची घोषणा केली आहे.

केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा – काय आहे योजना?

१ फेब्रुवारी २०२४ रोजी अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी ‘उद्यम पोर्टल’वर नोंदणी करणाऱ्या लघु उद्योगांसाठी ५ लाख रुपयांच्या मर्यादेसह मायक्रो क्रेडिट कार्ड योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली. “पहिल्या वर्षी १० लाख मायक्रो क्रेडिट कार्ड दिली जातील,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

नोंदणी आणि अर्ज कसा करावा?

जर तुम्ही सूक्ष्म आणि लघु उद्योग (MSME) क्षेत्रात असाल, तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल –

उद्यम पोर्टल http://msme.gov.in  वर भेट द्या.
Quick Links वर क्लिक करून ‘Udyam Registration’ निवडा.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे आणि पात्रतेची माहिती मिळेल.
संपूर्ण नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून अर्ज दाखल करा.

या नव्या योजनांमुळे उद्योगांना काय फायदा होईल?

सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी क्रेडिट गॅरंटी कव्हर ५ कोटी रुपयांवरून १० कोटी रुपये करण्यात आले आहे. पाच वर्षांत दीड लाख कोटी रुपयांचे अतिरिक्त कर्ज मिळण्याचा अंदाज आहे. स्टार्टअप्ससाठी गॅरंटी कव्हर १० कोटी रुपयांवरून २० कोटी रुपयांपर्यंत दुप्पट करण्यात आले आहे. निर्यातदार MSME उद्योजकांसाठी वाढीव गॅरंटी कव्हरसह २० कोटी रुपयांपर्यंतच्या मुदत कर्जाचा लाभ मिळणार आहे. (PM Modi Government )

छोट्या उद्योगांसाठी मोठी संधी!

या नव्या मायक्रो क्रेडिट कार्ड योजनेमुळे लघु आणि सूक्ष्म उद्योगांना अधिक वित्तीय मदत मिळणार आहे. तसेच, उद्योगधंदे वाढवण्यासाठी आणि आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे.

Title : PM Modi Government Launches Micro Credit Card for MSME 

 

Join WhatsApp Group

Join Now