शेतकऱ्यांनो सावधान! ‘ही’ गोष्ट करा अन्यथा पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही

On: January 7, 2026 1:45 PM
PM Kisan Yojana 2026
---Advertisement---

PM Kisan Yojana 2026 | नवीन वर्षाची सुरुवात शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरली असली तरी पीएम किसान सन्मान निधी योजनेतील लाभ सुरू ठेवण्यासाठी सरकारने महत्त्वाचा नियम लागू केला आहे. 2026 मध्ये पीएम किसान योजनेअंतर्गत 22वा, 23वा आणि 24वा असे सलग तीन हप्ते देण्याची तयारी केंद्र सरकारने केली आहे. मात्र हे हप्ते कोणत्याही अडथळ्याविना थेट खात्यात जमा व्हावेत, यासाठी काही प्रक्रिया पूर्ण करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.

सरकारने स्पष्ट इशारा दिला आहे की Farmer ID नोंदणी आणि e-KYC पूर्ण न केल्यास पुढील हप्त्यांचा निधी थांबवला जाऊ शकतो. त्यामुळे पीएम किसान योजनेचा लाभ सुरू ठेवायचा असेल, तर शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया तात्काळ पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा वर्षभर मिळणाऱ्या आर्थिक मदतीपासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते.

पीएम किसान योजना आणि Farmer ID का महत्त्वाची? :

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारने 2019 मध्ये सुरू केली होती. या योजनेअंतर्गत पात्र लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केली जाते. DBT प्रणालीमुळे मध्यस्थांचा हस्तक्षेप टाळला जातो आणि लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो. (PM Kisan Yojana 2026)

आता या योजनेत Farmer ID अनिवार्य करण्यात आली आहे. Farmer ID ही शेतकऱ्याची डिजिटल ओळख असून त्यामध्ये शेतजमिनीचा तपशील, पीक पद्धती, खतांचा वापर, पशुपालनाची माहिती आणि उत्पन्नाशी संबंधित नोंदी असतात. यामुळे बनावट नोंदणी रोखणे आणि सरकारी योजनांचा लाभ केवळ पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे.

PM Kisan Yojana 2026 | Farmer ID कशी काढायची? प्रक्रिया काय आहे? :

Farmer ID साठी शेतकऱ्यांना आधार कार्ड आणि आधारशी जोडलेला मोबाईल नंबर आवश्यक आहे. तसेच जमिनीशी संबंधित कागदपत्रे जसे खसरा किंवा जमाबंदीची माहिती द्यावी लागते. अनेक राज्यांमध्ये AgriStack पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आधारद्वारे e-KYC पूर्ण केल्यानंतर जमिनीची आणि कुटुंबाची माहिती भरावी लागते. (PM Kisan Installment Date)

सर्व माहिती योग्य असल्यास संबंधित विभाग तपासणी करून युनिक Farmer ID जारी करतो. जर एखाद्या शेतकऱ्याकडे वेगवेगळ्या ठिकाणी शेतजमीन असेल, तर सर्व जमिनींची नोंद एका Farmer ID मध्ये करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना अडचण येऊ नये म्हणून पंचायत स्तरावर विशेष नोंदणी शिबिरेही आयोजित केली जात आहेत. (Farmer ID Mandatory)

पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता कधी मिळणार? :

पीएम किसान योजनेचा पुढील म्हणजेच 22 वा हप्ता फेब्रुवारी 2026 मध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र चार महिन्यांच्या पॅटर्ननुसार फेब्रुवारी हा संभाव्य कालावधी मानला जात आहे.

22 व्या हप्त्यानंतर 23 वा हप्ता जुलै 2026 मध्ये तर 24 वा हप्ता नोव्हेंबर 2026 मध्ये मिळण्याची अपेक्षा आहे. संपूर्ण वर्षभर हप्ते वेळेत मिळावेत, यासाठी Farmer ID आणि e-KYC पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा ‘हप्ता थांबेल’ असा स्पष्ट इशारा सरकारने दिला आहे.

News Title: PM Kisan Scheme 2026: Farmer ID Mandatory for Installments, Check Application Process

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now